Sambhaji Nagar News: गावकऱ्यांच्या स्टिंगने खळबळ; महिला सरपंच पतीराजाचीच कारनामे आले समोर

शिक्के सोडा सही देखील सरपंच पतीराजाचीच; गावकऱ्यांच्या स्टिंगने खळबळ
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar NewsSaam tv
Published On

संभाजीनगर : आजपर्यंत महील लोक प्रतिनिधी च्या जागी त्यांचे पती कारभार करीत असल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिले असेल. मात्र छ्त्रपती संभाजीनगरमध्ये (Aurangabad) तर यापुढे जाऊन महिला सरपंचाचे (sarpanch) पती शिकके आणि सही देखील करून विविध प्रमाणपत्र व चेकवर देखील पत्नीची सही करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Sambhaji Nagar News
Chandrashekhar Bawankule: मातोश्री बाहेर येवून बैठक घेताय हे लोकशाहीसाठी चांगले; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

गंगापूर तालुक्यात गाजगाव ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत महिला राखीव असल्याने यावर आशाबाई धुमाळ या निवडून आल्या आहेत. मात्र त्या सरपंच झाल्यापासून केवळ एक दोन वेळाच ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. त्या कोणत्याही सभेला उपस्थित राहत नाही; असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आशाबाई यांच्या ऐवजी त्यांचे पती तुळशीराम धुमाळ जे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. तेच पत्नीचा सरपंच पदाचा सर्व कारभार बघतात. एवढेच नाही तर ते कार्यालयीन चेकवर देखील सही करतात आणि ते चेक वटतात देखील. यामुळे ग्रामसेवक देखील या गैरव्यवहारात सामील असल्याचं आरोप होत आहे. गावकऱ्यांनी केलेल्या स्टिंगमध्ये सरपंच पती धुमाळ हे कार्यालयात बसून शासकीय शीक्के मारत आहेत. त्या पत्रावर सही करून देत असल्याचे दिसत आहे.

Sambhaji Nagar News
Sanjay Shirsat: राष्ट्रवादी भाजपसोबत यायला एक पायावर तयार; आमदार संजय शिरसाट

सीईओकडे व्‍हीडीओ केला सादर

गावकऱ्यांनीच सरपंचाच्या ऐवजी त्यांचे पती काम करत असल्याचा भांडाफोड करीत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली. गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथे महिला सरपंच असताना त्या ग्रामपंचायतीत येऊन काम करण्याऐवजी त्यांचे पतीच ग्रामपंचायतमध्ये बसून कारभार हाकत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यासाठी गावकऱ्यांनी या सरपंच पतीचे स्टिंग ऑपरेशन करत व्हिडीओ देखील बनवला. याची थेट जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली. आता संबधित सरपंच आणि ग्रामसेवकाला नोटीस पाठवलीय. शिवाय आज सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  आज दुपारी जिल्हा परिषदेच्या सीईओसमोर याबाबत चौकशी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com