Sangli Agriculture News : उन्हाचा तडाखा; द्राक्षबागांवर पाणी फवारणीची वेळ; वाढत्या तापमानामुळे शेतकरी हैराण

Sangli Latest News : उन्हाचा तडाखा; द्राक्षबागांवर पाणी फवारणीची वेळ; वाढत्या तापमानामुळे शेतकरी हैराण
Sangli Agriculture News
Sangli Agriculture NewsSaam TVz

Sangli Agriculture News : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या उष्णतेची झळ द्राक्षांना बसत आहे. तर उन्हाची उष्णता कमी करण्यासाठी द्राक्ष () उत्पादकांकडून झाडांवर पाणी फवारणी करावी लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे खरडछाटणीनंतर द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत.

तासगाव तालुक्यात जवळपास 9 हजार 700 हेक्टरवर द्राक्ष शेती करण्यात येते. यापैकी जवळपास 9 हजार 500 हेक्टर वरील द्राक्षांची खरडछाटणी झाली आहे. यंदाच्या हंगामात एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या खरड छाटणीपासूनच संकटाची मालिका सुरू झाली आहे.

Sangli Agriculture News
Swabhimani Shetkari Sanghatana News : कांदा उत्पादकांना एकरी ६० हजार रुपये भरपाई द्या : प्रशांत डिक्कर

दिवसा सरासरी तापमान ४० अंशाच्या आसपास असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम द्राक्ष शेतीवर होत आहे. कोवळ्या काड्या वाळल्या तर ओलांड्यावर काड्यांची संख्या कमी होईल आणि त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या उत्पादनावर होईल, असा धोका निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

चालू वर्षी एप्रिलमध्ये खरड छाटणी घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी द्राक्षाच्या झाडावरील ओलांड्याच्या कोवळ्या काड्या कडक उन्हामुळे वाळून चालल्याचे दिसू लागल्याने झाडावरील काड्यांची संख्या कमी होऊन उत्पादन घटण्याचा धोका वाढत आहे. या काड्या वाचविण्यासाठी शेतकरी झाडांवर ब्लोअरच्या सहाय्याने पाणी फवारण्यास सुरवात केली आहे.

Sangli Agriculture News
Sangli Court : 'दत्त इंडिया' च्या संचालकांवर FRP प्रकरणावरुन गुन्हा दाखल हाेणार : रघुनाथदादा पाटील

याचा चांगला फायदा होत आहे. द्राक्ष बाग वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी द्राक्ष झाडांवर दिवसातून दोन वेळा पाणी फवारण्याचा उपाय केला जात आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी गरजेनुसार औषध फवारणी सुद्धा सुरू आहे.

दरम्यान, तासगाव तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे द्राक्ष शेतीला धोका निर्माण झाला आहे. काड्या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष झाडांवर दिवसातून एक ते दोन वेळा पाणी फवारण्यास सुरुवात केली आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच केला जात असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com