Swabhimani Shetkari Sanghatana News : कांदा उत्पादकांना एकरी ६० हजार रुपये भरपाई द्या : प्रशांत डिक्कर

लागवडीचा खर्चही भरुन निघत नसल्याने शेतक-याची सर्व मेहनत वाया गेली.
swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest News
swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest Newssaam tv
Published On

Buldhana News : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर (prashant dikkar) यांनी सरकारला केली आहे. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह आंदाेलन छेडण्याचा इशारा डिक्कर यांनी दिला आहे. (Maharashtra News)

swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest News
Sangli Court : 'दत्त इंडिया' च्या संचालकांवर FRP प्रकरणावरुन गुन्हा दाखल हाेणार : रघुनाथदादा पाटील

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सतत अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय. निरोड शिवारात अंनता अवचार यांनी ३ एकर कांदा लागवड केला होता. अवचार यांनी परिवारासह शेतात रात्र दिवस मेहनत घेऊन कांदा वाढवला पंरतु सतत अवकाळी पाऊस पडल्याने ३ ही एकर कांद्या सडुन गेला आहे.

या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने एकरी ६० हजार रुपये नुकसानिची भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे.

swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest News
Saam Impact : 'साम टीव्ही'च्या बातमीनंतर अवघ्या दीड तासांत शासकीय रुग्णालयाचा विद्युत पुरवठा पूर्ववत

शेतकऱ्याने ३ एकराला २ लाख रुपये लागवडसाठी खर्च केला. परंतु पुर्णपणे कांदा सडल्याने लागवडीचा खर्चही भरुन निघत नसल्याने सर्व मेहनत वाया गेली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

swabhimani shetkari sanghtana Latest News, Beed Latest News
Ramdas Kadam News : शरद पवारांना बाप म्हणता ना, त्यांच्याकडून काही तरी शिका : उद्धव ठाकरेंना रामदास कदमांचा सल्ला

यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी महसुल विभागाचे व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांना शेतात नेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या कांदा नुकसानिची पाहणी केली. सरकारने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे तीव्र आंदोलन राज्य सरकारला महागात पडणार असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com