Maharashtra Samruddhi Mahamarg Inauguration News: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Highway) लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात विविध मुद्दे माडंले आहेत. आमचं डबल इंजिन सरकार आहे, त्यामुळे हे शक्य झालं, असं फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचेही आभार मानले. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचंही त्यांनी कौतुक केलं.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देतो. नागरपूरच्या जनतेकडून पंतप्रधान मोदींचं स्वागत करतो. या महामार्गाचं उद्घाटन केवळ तुमच्या हातून व्हावं अशी आमची इच्छा होती. वीस वर्षांपूर्वी आम्ही हे स्वप्नं पाहिलं होतं. पण तुम्ही नसते तर हे केवळ एक स्वप्नंचं राहिलं असतं. तुम्ही ताकद दिली, तुम्ही हिंमत दिली, तुम्ही आधार दिला आणि तुम्ही जबाबदारी दिली त्यामुळे हा महामार्ग आम्ही करु शकलो. (Devendra Fadnavis Uncut Speech)
खूप कमी लोकांना तेव्हा असा विश्वास होता की, असा महामार्ग बनू शकेल. पण, एक व्यक्ती असा होता की, तो पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास ठेवून यावर काम करत होता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे, त्याकाळातील माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जे पहिल्या दिवसापासून रस्त्यावर एकत्र येऊन काम करत होते. आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या पक्षांना एकत्र आणलं. सगळ्या पत्रकारांना, संपादकांना एकत्र आणलं. त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली त्यानंतर या मार्गासाठी सुरूवात केली. (Latest Marathi News)
सर्वात अगोदर भूमी अधिग्रहण हा एक मोठा मुद्दा होता, त्यासाठी खूप पैसे लागणार होते. आम्ही बॅंकांकडे कर्ज मागितलं पण ते मिळालं नाही. पंतप्रधान महोदय आमच्या महाराष्ट्र सरकारची काही मुलं अशी आहेत, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. एमएमआरडीए आहे, एमआयडीसी आहे, सिडको आहे... आम्ही त्यांना म्हटलं की, सगळा पैसा मुंबईत कमावून मुंबईत वापरू नका. आता हा पैसा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठीही वापरा.
आम्ही त्यांच्याकडून पैसे उधार घेतले आणि केवळ ९ महिन्यात सुमारे ७०० किलोमीटर जमिनीचं आम्ही अधिग्रहण केलं. यात एकनाथ शिंदे यांनी स्वतः गावोगावी जाऊन सह्या केल्या. कारण, तेव्हाचे त्यांचे नेते गावोगावी जाऊन विरोध करत होते आणि एकही इंच जमीन देऊ नका असं म्हणत होते. पण, १५ दिवसांनी आम्हाला गावकऱ्यांनी एक एक इचं जमीन दिली आणि आम्ही भूमी अधिग्रह केलं.
सोबत आम्ही एक मॉडेल तयार केलं, ज्यात आम्ही एमएसआरडीसीला ५० हजार कोटींचे मुंबईतील प्लॉट त्यांना दिले, त्यांचं उत्पन्न वाढवलं आणि लॅण्ड सिक्योरिटाइजेशन मॉडेलवर सर्वात अगोदर पैसे जमा केले. सगळ्या बॅंकांना बोलावलं. सगळ्यात अगोदर एसबीआय बॅंकेने आम्हाला आठ हजार कोटी रुपये दिले. त्यानंतर सगळ्या बॅंकांनी पैसे दिले, पैशांची कमतरता जाणवली नाही आणि आज ५० हजार कोटींचा हा महामार्ग तयार झाला आहे. (Breaking Marathi News)
पंतप्रधान महोदय तुम्ही जे लॅण्ड सिक्योरिटाइजेशन मॉडेल आणि मॉनिटाजेशनचं मॉडेल आणलं आहे, याने मी दाव्याने सांगू शकतो की येणाऱ्या दोन वर्षांमध्ये या महामार्गातून ५० हजार कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे जे इतर बांधकामांसाठी आम्ही वापरू शकू इतकं सुंदर मॉडेल तुम्ही बनवलं आहे. सोबतच तुम्ही भारताला गती शक्ती नावाची जी योजना दिली आहे, जी जगातली सर्वात चांगली योजना आहेत.
सर्वात विचारशील आणि कल्पनाशक्ती असलेली योजना आहे, जे भारताचं चित्र बदलेल. गती शक्ती योजनेचं हा महामार्ग एक चांगलं उदाहरण आहे. यात सस्ता बनवला आहे, यात आम्ही रेल्वेसाठी जागा ठेवली आहे. यात आम्ही सेमी हायस्पीड कार्गोट्रेन सुरू करु इच्छितो, त्याबाबत आम्ही जमीन अधिग्रहीत करुन ठेवली आहे.
यात आम्ही मल्टी युटीलीटी कॉरिडोअर तयार केला आहे. मल्टी युटीलीटी कॉरिडोअरसाठी मी भारत सरकारचे आणि आपले आभार मानतो. २०१७ मध्ये आम्ही मागणी केली की यावर गॅस पाइपलाइन टाकावी त्याचं काम तुम्ही सुरू केलं. याचं ८० टक्के काम पूर्ण झालं. महाराष्ट्राच्या २० जिल्ह्यामध्ये थेट सीएनजी गॅस उद्योगांसाठी आणि वाहनांसाठी आता या पाइपलाइनच्या माध्यमातून पोहोचेल. सोबतच आम्ही पेट्रोलिअम प्रोडक्ट पाइपलाइनचीही मागणी केली आहे जी पूर्ण होणार आहे. (LIVE Marathi News)
यासोबतच जे अंडर सी (समुद्राच्या खाली) केबल्स आहेत, ज्यामुळे डेटा सेंटर्सची इको सिस्टम तयार होते ती पूर्ण अंडर सी केबल आम्ही या माध्यमातून आणणार आहोत. यामुळे संपूर्ण क्षेत्रात आम्ही डेटा सेंटर्स उभारू शकणार आहोत. सोबतट ट्रान्समिशनची एचबीडीसी लाईनही इथे होईल, त्यासाठीही कॉरिडोअर आम्ही तयार केलं आहे. १५० मेगावॅट सौर विद्युत उर्जा येथे तयार होणार आहे. एकुणच गती शक्तीचं मोठं उदाहरण आम्ही इथे साकारलं आहे. तुम्ही दिलेल्या योजनेने आम्ही याला आणखी समृद्ध करु. (Tajya Batmya)
मी या निमित्ताने एवढंच निवेदन करु इच्छितो की, तुम्ही आणि गडकरीजींनी आम्हाला ही भेट दिली आहे. रेल्वेस्टेशन सुंदर होतायत. रेल्वे कनेक्टीव्हीटी आहे, रोड कनेक्टीव्हीटी आहे हायस्पीड रेल्वेदेखील होणार आहे. यासोबत तुमच्या आशीर्वादाने पुढच्या एका महिन्यात नागपूर विमानतळाच्या भूमीपूजनासाठी आम्ही तुम्हाला बोलावणार आहोत. सर्व मल्टीमॉडेल कनेक्टीव्हीटी इथे होणार आहे. मी असं मानतो की, आज १४ जिल्हे आम्ही जेनपीटी पोर्टने जोडले आहेत. आणि आमचे मुख्यमंत्री गडचिरोली आणि गोंदियाला देखील जोडणार आहे. तर पूर्ण महाराष्ट्र एक पोर्ट लेयर डेव्हलपमेंटचं एक नवं मॉडेल या महामार्गाच्या माध्यमातून करणार आहे.
यावेळी मी काही नाव आवर्जून करु इच्छितो, ज्यात आमचे राधेश्याम मोकलवार, मनोज सावनिक, प्रविण परदेशी, गायकवाड तसेच महामार्गाच्या टीमने जबरदस्त काम केलं आहे. यांच्यामुळे हा महामार्ग होऊ शकला. आता पुढच्या टप्प्यात नागपूर ते गोवा याचप्रकारचा महामार्ग जो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडेल याचीही संकल्पना आम्ही तयार केली आहे. (Maharashtra News)
आज जे दोन प्रकल्प होतायत. मेट्रो-२ आणि नाग नदीचं संवर्धन. आमच्या मागील सरकारने जे हे दोन्ही प्रकल्प पाठवले होते, ते तुम्ही फास्टस्ट्रॅकवर ठेवले. यात काही चौकश्या आल्या होत्या, मध्येच सरकार बदललं. याकाळात त्या चौकश्यांच उत्तरही देण्यात मागच्या सरकारकडून आलं नाही.
जसं सरकार बदललं तसं आम्ही चौकश्या पूर्ण केल्या आणि मी पंतप्रधान कार्यालयात गेलो आणि विनंती केली की आम्ही क्वेरीज पूर्ण केल्या आहेत, तेव्हा पीएमओ कार्यालयाने क्वेरी पूर्ण करून केवळ ३५ दिवसांत या दोन्ही प्रोजेक्टला कॅबिनेटची मान्यता दिली. आज त्याचं भूमीपूजन होतंय. हे मोदी सरकार आहे, ही गती आहे. आणि हे डबल इंजिन सरकार आहे. जर हे डबल इंजिन सरकार नसतं कर आणखी काही वर्षे क्वेरीज पूर्ण झाल्या नसल्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते. मी पंतप्रधानांचं आभार व्यक्त करतो. तुमचं प्रेम नागपूर आणि विदर्भावर असंच राहू द्या. एम्स सारखी भेट तुम्ही आम्हाला दिली. वंदे भारत ट्रेन दिली या सर्वांसाठी सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.