Samruddhi Highway: आधीच अपघातांमुळे चर्चेत, आता चक्क लोखंडी सळीच उखडली! समृद्धीच्या बांधकामावरच सवाल

Buldhana News: आधीच अपघातांमुळे चारसत असलेल्या समृद्धी महामार्गावर एक भीषण प्रकार समोर आला आहे. ऐक महामार्गाच्या मधोमध चक्क लोखंडी सळीच उखडली गेली आहे.
Samruddhi Highway
Samruddhi HighwaySaam Tv
Published On

Samruddhi Highway News:

आधीच अपघातांमुळे चारसत असलेल्या समृद्धी महामार्गावर एक भीषण प्रकार समोर आला आहे. ऐक महामार्गाच्या मधोमध चक्क लोखंडी सळीच उखडली गेली आहे. याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत, जे पाहून अनेक नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत.

यातच समृद्धी महामार्गाला जेमतेम एक वर्ष बांधून पूर्ण झालं आहे. मात्र समृद्धी महामार्गावर कुठे खड्डे पडले आहेत तर, कुठे पुलावरून लोखंडी भाग तुटून वर आल्याचे दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samruddhi Highway
National Politics News: जगदीप धनखड यांनी 'आप'ला दिला दणका, राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते स्वीकारण्यास दिला नकार

गुरुवारी रात्री समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ चैन नंबर 319 येथे मुंबई कॉरिडॉरवर एका मोठ्या पुलावर पुलाचा लोखंडी भाग तुटून हा महामार्गावर आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली होती. (Latest Marathi News)

मात्र एका वाहन चालकाने थांबून याचा व्हिडिओ बनवून तात्काळ जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली. त्यामुळे मात्र अनेक वाहनांचे मोठे अपघात टळले आहेत. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा ही 120 किलोमीटर प्रतितास असल्याने या महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय जास्त असतो.

Samruddhi Highway
Maharashtra Politics Explainer: राज ठाकरे महायुतीत सामील होणार? राजकीय फायदा कुणाला होईल?

यातच अशा लोखंडी भागाला जर वाहन धडकले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आज एका वाहन चालकाच्या समय सुचकतेने हा प्रकार टळला आहे. तात्काळ समृद्धी महामर्गाच्या दुरुस्ती यंत्रणेने याची दुरुस्ती केली आहे. आता महामार्गावर वाहतूक सुरळीत जरी सुरु असली तरी याच्या बांधकामाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com