Samruddhi highway Accident: 'समृद्धी'वर अपघाताचे सत्र सुरूच! पुन्हा दोन ठिकाणी अपघात; ४ जण जखमी

Accident On Samruddhi Highway: अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
Accident On Samruddhi Highway
Accident On Samruddhi HighwaySaamtv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी...

Samruddhi Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आज (३१,मे) रोजी महामार्गावर पुन्हा दोन अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Accident News)

Accident On Samruddhi Highway
Kolhapur News: कोल्हापुरकरांचा नादच खुळा! लग्नानंतर नवदांपत्याची हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, जोतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी

याबाबत अधिक माहिती अशी की, आज समृद्धी महामार्गावर पुन्हा दोन अपघात झाल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील चॅनल नंबर 262 व चॅनल नंबर 263 या ठिकाणी दोन अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये सकाळी सहा वाजता आणि दुसरा अपघात आठ वाजण्याच्या सुमारास घडला.

कार पलटी झाल्याने पहिला अपघात घडला. ही गाडी (MH 27 bv3827) पुण्याकडून नागपूरकडे जात होती. यावेळी सीएच नंबर 263 वर गाडीचे टायर फुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये शितल सुकाळकर, अतुल इंगोले, अजय पाटील हे नागपूरचे प्रवासी जखमी झाले असून त्यांना ॲम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Samruddhi Mahamarg Accident)

Accident On Samruddhi Highway
Congress MP Balu Dhanorkar Passed Away: बाळू धानोरकर यांच्या निधनाने शोक अनावर; राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

दुसरा अपघात हा चालकाला डुलकी लागल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबादकडून मालेगावकडे जात असताना सीएस नंबर 262 वर गाडी चालकाला झोपेची डुलकी लागल्याने समोरील चालू ट्रकला मागून धडक दिली.

या अपघातात रफिक पटेल (रा.औरंगाबाद हे) किरकोळ जखमी झाले असून त्यांना ॲम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी मालेगाव येथे रवाना केले आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंंडी झाल्याचे पाहायला मिळाले. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com