Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; चौकशी आवश्यक, NCBकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात यावी, यासाठी एनसीबीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दरम्यान आतापर्यंत समीर वानखेडे यांना ८ समन्स पाठवण्यात आले आहेत, पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झालेल नाहीत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
Former NCB Director
Sameer Wankhede yandex

(गिरीश कांबळे, मुंबई)

NCB Inquiry Of Sachin Wankhede :

एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वानखेडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे, असं प्रतिज्ञापत्र एनसीबीने हायकोर्टात दिले आहे. आतापर्यंत समीर वानखेडे यांना ८ समन्स पाठवण्यात आले आहेत, पण वानखेडे चौकशीसाठी अजूनही हजर झालेल नाहीत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (Latest News)

आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या चौकशीची मान्यता दिल्यास चौकशी समितीची स्थापना केली जाऊ शकते. समीर वानखेडे यांनी बॉलिवूड आणि डग्ज कनेक्शनची प्रकरणे बाहेर काढत कारवाईचा धडाका सुरू केला होता. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com