Maharashtra Politics: स्थानिक आमदारांना संभाजीराजेंचा कडक इशारा; म्हणाले, " गुपचूप प्रशासकीय बैठक लावून...

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत." , असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV

Maharashtra Politics : विशाळगडावर सुरू असलेले अतिक्रमण यामुळे गडाची अवस्था विषन्न झाली आहे. यात आता स्थानिक आमदार सुरू असलेली कारवाई बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. असा दावा करत संभाजीराजे छत्रपती यांनी नाव न घेता आमदार विनय कोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. " तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत." , असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. (Latest sambhajiraje chhatrapati News)

आपल्या फेसबूक पेजवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आमदार विनय कोरे यांच्यावर निशणा साधला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, " विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल. दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून आम्ही जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली."

Maharashtra Politics
Chhatrapati Sambhaji Maharaj : धर्मवीर की स्वराज्यरक्षक ? मराठा सेवा संघाची भूमिका स्पष्ट

गुपचूप प्रशासकीय बैठक कशासाठी?

" बैठकीत ही सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ?" असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

"आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे. राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल.", असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक आमदारांना यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com