Kolhapur Loksabha: कोल्हापूरची जनता महाराजांसोबत; ही लोकभावना विजयाची शाश्वती: संभाजीराजे छत्रपती

Maharashtra Loksabha Election News: कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे," असा विश्वासही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.
Sambhajiraje Chhatrapati News:
Sambhajiraje Chhatrapati News:Saamtv

Sambhajiraje Chhatrapati News:

महाविकास आघाडीकडून कोल्हापुर लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार असून महाराजांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. अशातच शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणालेत संभाजीराजे?

"अभिनंदन बाबा! गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या (Shahu Maharaj Chhatrapati) प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली."

"मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Sambhajiraje Chhatrapati News:
Maharashtra Election : महाराष्ट्रात पुढील २-३ दिवसांत 'राजकीय धुळवड'; मोठ्या घडामोडींची शक्यता

लोकभावना हीच विजयाची शाश्वती!

तसेच "खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धी पासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे, राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे," असा विश्वासही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Sambhajiraje Chhatrapati News:
Maharashtra Lok Sabha: 80 टक्के काम पूर्ण, दोन दिवसात जागावाटप जाहीर होणार: देवेंद्र फडणवीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com