Sambhajinagar News: पाऊस आल्याने प्लास्टिकखाली एकत्र बसले, अन् काळाने घाला घातला, वीज कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Sambhajinagar Rainfall: मराठवाड्यात १४ दिवसांत वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आज अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
Sambhajinagar News: पाऊस आल्याने प्लास्टिकखाली एकत्र बसले, अन् काळाने घाला घातला, वीज कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
Sambhajinagar NewsSaam TV
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वैजापूर तालुक्यातील शिवाराईमध्ये ही घटना घडली. शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला. पावसापासून बचाव करण्यासाठी चौघेही प्लास्टिक डोक्यावर घेऊन बसले. तेवढ्यात वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात १४ दिवसांत वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील शिवराई शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. भागवत काशिनाथ डीके (वय ३२ वर्षे) या व्यक्तीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर सचिन आसाराम सोनवणे, वनिता सागर सोनवणे आणि निता सचिन सोनवणे हे तिघे जण अंगावर वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.

Sambhajinagar News: पाऊस आल्याने प्लास्टिकखाली एकत्र बसले, अन् काळाने घाला घातला, वीज कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
Pune Accident : वर्षश्राद्ध करून घरी परतताना काळाचा घाला, माजी उपसरपंचाचा अपघाती मृत्यू

या घटनेबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनवणे कुटुंबीय हे शिवराई शिवारात गट क्रमांक २२ मध्ये पेरणी करत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. पावसापासून संरक्षण करण्यासाठी चौघेही प्लास्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन मोकळ्या जागेत बसले. त्याचवेळी अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले.

Sambhajinagar News: पाऊस आल्याने प्लास्टिकखाली एकत्र बसले, अन् काळाने घाला घातला, वीज कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
Nagpur Chamunda Company Blast: मंत्र्यांचे नातेवाईक हप्ता वसुली करतात; विजय वडेट्टीवार आक्रमक, महायुती सरकारवर गंभीर आरोप

जखमी झालेल्या चौघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भागवत डीके यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Sambhajinagar News: पाऊस आल्याने प्लास्टिकखाली एकत्र बसले, अन् काळाने घाला घातला, वीज कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी
VIDEO Pune Bus fire : धुराचे लोट अन् प्रवाशांचा आरडाओरडा; धावती बस अचानक पेटली, भयंकर आगीची घटना कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com