छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सण उत्सवामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारा गावठी कट्टा व ५ जिवंत काडतूसासह एका २४ वर्षीय आरोपीस संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले आहे.
संभाजीनगरच्या (Sambhajinagar) वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एकजण गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज येथे पोलिसांनी (Police) सापळा रचुन संशयित आरोपी सुरज पाईकराव याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील ३० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा व लोखंडी धातुचा (मॅगझीन नसलेला त्यास लाकडी मुठ असलेला) गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे पाच जिवंत काडतुस तसेच 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल
वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुरज पाईकराव यांच्याकडून सुमारे ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.