Sambhajinagar News : शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात एकरी १० हजार द्यावे; खुद्द विभागीय आयुक्तांचीच मागणी

Farmer News : शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात एकरी १० हजार द्यावे; खुद्द विभागीय आयुक्तांचीच मागणी
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर प्रत्येक शेतकऱ्यांना (farmer) प्रत्येक हंगामात प्रति एकरी १० हजार रुपये द्यावं अशा मागणी खुद्द विभागीय आयुक्तानी सरकारकडे केली. (Sambhajinagar) त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे लवकरचं पाठवणार असल्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. (Live Marathi News)

Sambhajinagar News
Jalgaon News : पत्‍नीसोबत जेवण केल्‍यानंतर संपविले जीवन; तीनच महिन्यापुर्वी झाले होते लग्‍न

मराठवाड्यात दिवसाला सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. या चालू वर्षातल्या चार महिन्यांत तब्बल ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पाऊस काही पिच्छा सोडत नाही. बेभरोशी शेती झाल्यानं सावकारी कर्ज आणि संकटात सापडलेला कुटुंबाचा आर्थिक गाडा पेलवत नसल्याने शेतकरी मरणाला जवळ करतोय. आता त्याच शेतकऱ्यांना वाचवायचं असेल, तर प्रत्येक हंगामाला प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये द्यावे; असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचं संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.

Sambhajinagar News
Dhule News : गावठी बनवटीच्या पिस्तुलांसह दोन जण पोलिसांच्या ताब्यात

५ लाख शेतकऱ्यांचा सर्व्हे 

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या का वाढतायत याचे सर्वेक्षण सुरू आहे. जवळपास २२ लाख शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या पाच लाख शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण झाले आहे. त्या सर्वेक्षणात ज्या मुद्द्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. सततची नापिकी, नैसर्गिक संकटे त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे प्रत्येक हंगामाला एकरी दहा हजार रुपये द्यावे असा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

Sambhajinagar News
Farmer Demand Helicopter : शेतात ये - जा करण्यासाठी केली चक्क हेलिकॉप्टरची मागणी; शेतकऱ्यांनी तहसीलदाराला दिले निवेदन

आतातरी सरकार मनावर घेईल का?
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणून कर्जमाफी करण्यात आली. त्यानंतर त्यावरून सुद्धा मोठे राजकारण राज्यात दिसून आलं. शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यापूर्वी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संवाद साधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्याचं काय झालं हे अजूनही समोर आलं नाही. आता राज्य सरकारच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पाठवल्यानंतर खरंच सरकार मनावर घेतलं का? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com