Sambhajinagar : खवड्या डोंगरावरील ३ जणांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण, कुणालच्या मावशीचा गंभीर आरोप, व्हिडीओनं उडाली खळबळ

Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण. मुरलीधर चांदगुडे यांच्या आईच्या आरोपांना पल्लवी जऱ्हाड यांनी दिले थेट प्रत्युत्तर. जुन्या कौटुंबिक वादावर गंभीर सवाल उपस्थित.
Chandgude family tragedy at Khavdya Hill
Chandgude family tragedy at Khavdya HillSaam Tv
Published On
Summary
  • खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण

  • मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केलेल्या आरोपांना पल्लवी जऱ्हाड यांनी थेट प्रत्युत्तर

  • घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट

  • पुढील तपास अद्याप सुरु आहे

छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाचा दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील खडव्या डोंगरावर कुणाल चांदवडे हा आत्महत्या करण्यासाठी गेला होता. यादरम्यान आईवडिलांनी आणि नागरिकांनी डोंगरावर जाऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाल कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलाला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले असता मुलाने उडी मारली. मुलाला वाचवताना कुणालचे वडील मुरलीधर चांदवडे यांचा देखील दरीत कोसळून मृत्यू झाला. नवरा आणि मुलगा खाली पडल्याचे पाहून कुणालची आई संगीता चांदवडे यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यात संगीता यांनी देखील डोंगरावरून उडी मारली. या तिघांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. कोणी म्हणालं कुणालने आई वडिलांकडे आयफोनसाठी हट्ट केला, तर कोण म्हणतंय घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केलेल्या आरोपांवर कुणालच्या मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

Chandgude family tragedy at Khavdya Hill
EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

मुरलीधर चांदगुडे यांना गेल्या २० वर्षांपासून संगीता चांदगुडे यांनी कुटुंबापासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांच्या आईकडून करण्यात आला होता. या आरोपावर पल्लवी जऱ्हाड यांनी काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. “वीस वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावे, यासाठी त्याच्या डोक्यात फावडे का टाकण्यात आले होते?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी तुमच्या मुलाच्या जीवाला काही झाले असते, याचा विचार केला नव्हता का? असा सवालही पल्लवी जऱ्हाड यांनी केला आहे. त्यामुळे चांदगुडे कुटुंबातील जुन्या वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागचे नेमके कारण काय होते, याबाबतची सर्व माहिती योग्य वेळी समोर आणली जाईल, असे पल्लवी जऱ्हाड यांनी स्पष्ट केले. सध्या कुटुंबीय मोठ्या दुःखातून जात असून, या दुःखातून सावरण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली. खवड्या डोंगरावरील या घटनेनंतर तपास यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असतानाच आता कुटुंबातील जुन्या वादांचे संदर्भ समोर येत आहेत. मुरलीधर चांदगुडे यांच्या आईकडून करण्यात आलेल्या आरोपांना पल्लवी जऱ्हाड यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा गंभीर पैलू जोडला गेला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून, कुटुंबीयांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक दाव्याची पडताळणी होणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com