Sambhajinagar Crime : दारू वरून वाद; संभाजीनगरात एकाची हत्या, पहाटेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Sambhajinagar News : पहाटे पाच वाजेच्या सुमारास अशोक शिनगारे व निखिल शिंगाडे यांच्या सोबत आणखी दोन जण चौकात उभे राहून बोलत होते
Sambhajinagar Crime
Sambhajinagar CrimeSaam tv
Published On

रामू ढाकणे 
छत्रपती संभाजीनगर
: दारू पिल्यानंतर किरकोळ वाद झाल्यानंतर एकाने तरुणाच्या मानेवर चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरात घडली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

अशोक दादाराव शिनगारे (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असू निखिल शिंगाडे असे हत्या करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. (Sambhajinagar) दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास अशोक शिनगारे व निखिल शिंगाडे यांच्या सोबत आणखी दोन जण चौकात उभे राहून बोलत होते. या दरम्यान अशोक व निखिल यांच्यात थोडासा शाब्दिक वाद झाला. यातच अशोक यांच्या मानेवर चाकूने वार करत हत्या केली. (Crime News) यानंतर संशयित निखिल हा घटनास्थळावरून फरार झाला होता.  

Sambhajinagar Crime
Accident News : तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, आठजण जखमी

सीसीटीव्हीत घटना कैद 

चाळीस वर्षीय इसमाच्या मानेवर वार करत त्याला ठार केलेल्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून दारुमुळे हा खून झाल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून दरम्यान उस्मानपुरा पोलिसांनी संशयित आरोपी निखिल याला अटक केली असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com