बुलढाणा - 2018-19 आणि 2020 मध्ये झालेल्या टीईटी (TET) परीक्षांमध्ये गैरप्रकार करीत अपात्र परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे प्रकरण उजेडात आलं आहे. या प्ररणात सहभागी असलेल्या शिक्षकांचे (Teachers) वेतन न देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी काढले आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत भ्रष्टाचार करून असंख्य शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर नोकऱ्या मिळवल्या, मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बोगस मास्तरांचा बुरखा फाटला. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर राज्य परीक्षा परिषदे कडून राज्यातील ७ हजार ४७४ अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण संचालनालयास सादर करण्यात आली. या सर्व मास्तरांची शालार्थ आयडी गोठवण्यात आली असून, आता त्यांचे पगार बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
हे देखील पाहा -
त्यावरून बुलढाणा जिल्ह्यातील २९ बोगस शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १२ मास्तर माध्यमिक शाळेवर तर १७ जण प्राथमिक शाळेवर आहेत. त्यातील दोन मास्तर जिल्हा परिषदेच्या शाळेवर तर १५ जण खाजगी शाळेवर कार्यरत आहे. जिल्ह्यातल्या २९ बोगस मास्तरांपैकी चिखली शहरातील एकाच नामवंत शाळेतील तब्बल पाच शिक्षकांचा समावेश आहे. या टीईटी घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व बोगस मास्तरांमुळे इतर शिक्षकांची प्रतिमा देखील मलीन होत असून, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतांना दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 138 शिक्षकांचे पगार बंद
जळगाव जिल्ह्यातील 138 शिक्षकांचे पगार थांबविण्यात आले आहेत . यामध्ये प्राथमिकचे 67 तर माध्यमिकच्या 71 शिक्षकांचा समावेश आहे. टीईटी गैरप्रकारात (TET Scam) अपात्र असलेल्या शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे आता अपात्र शिक्षकाचे धाबे दणालेले आहेत.
दरम्यान, जळगावमधील (Jalgaon) अपात्र उमेदवारांची यादी मॅपिंगसाठी पाठविण्यात आली होती . अपात्र उमेदवारांपैकी 447 उमेदवार हे राज्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक , सहशिक्षक, मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्याचे समोर आले होते.
यांना वेतन अदा न करण्याचे सांगण्यात आले आहे . दरम्यान, यात जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागाचे 67 तर माध्यमिक विभागाच्या 71 शिक्षकांचा समावेश आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.