सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहाच्या दिवशीच एका २५ वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. शहरातील ओम नमः शिवाय नगर, कुमठे रोड परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सालिया (वय २५ वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. रविवारी रात्री सालियाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. आज तिचं लग्न होणार होतं. मात्र, लग्नाच्या (Wedding) काही तासांआधीच सालियाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येपूर्वी सालियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत परिसरातील तीन तरुण ब्लॅकमेल करत असल्याचं तिने म्हटलं आहे. सालियाच्या मृत्युला परिसरातील तीन तरुण जबाबदार असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
सालियाच्या वडिलांच्या आरोपानुसार, मुलीचे लग्न ठरल्यानंतर परिसरातील काही युवक तिला ब्लॅकमेलिंग (Crime) करीत होते. आरोपींनी सालियाचे फोटो एडिट करुन ते तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले होते. इतकंच नाही, तर आरोपींनी तिच्या नवऱ्याला फोन करुन देखील धमकावले होते.
ही बाब उघड होताच सालियाच्या वडिलांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, या तरुणांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर लग्न मोडण्याच्या भीतीने सालियाने सोमवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान, सालियाच्या मृत्युला जबाबदार असलेल्या तीन तरुणांवर तातडीने गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. सदरील वृत्त प्रकाशित होईपर्यंत पोलिसांनी याप्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता.
Edited by - Satish Daud-Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.