पडळकर फ्लॉवर समजे क्या फायर है फायर; सक्षना सलगर यांचा पडळकरांना इशारा

: सांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
Gopichand Padlkar
Gopichand PadlkarSaam Tv
Published On

सांगली : सांगली (sangli) महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक नेत्यांनी उपस्थीती लावली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सक्षना सलगर यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. 'गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) स्वतःला लय हिरो समजू नका. लडकी समजके फ्लॉवर समजे क्या. फायर हे फायर. असा इसारा राष्ट्रवादीच्या युवक महिला सक्षना सलगर यांनी पुष्पा स्टाईल पडळकरांना इशारा दिला.

Gopichand Padlkar
बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले: अजित पवार

'अरे तुम्हाला निवडून येता येत नाही. तुमचा मतदार संघ नाही. तुम्हाला मतदार संघ नाही म्हणून भाजपने बारामतीला पाठवलं होतं. तुम्हा तुमच्या मतदार संघात लढा. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी धनगर समाजातील लोकांना खट्याळ म्हणून वापरले आहे. अहिल्यादेवींनी राघोबादादांना जसा इशारा दिला होता. तसे फडणवीसांनी एकट्या पडळकरांच्या जिवावर उड्या मारू नयेत. नागपूरच्या तंबूत बांधून ठेवण्यची हिम्मत आमच्यात असल्याचे सक्षना सलगर म्हणाल्या.

मी मेंढपाळाची मुलगी आहे. जो कालवा त्याने निदानिय केला. कुठे धनगर समाजाला दावणीला लावायचे काम त्याने केले. जे अस्सल धनगर आहेत. ते काठी घोंगड याला मानतात. अहिल्यादेवीला जातीमध्ये कश्याला अडकवता आहात. असा सवालही सलगर यांनी केला. काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे ड्रोनद्वारे उद्घाटन केले यावरही टीका सलगर (Sakshana Salgar) यांनी केली.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com