साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन

गर्दीच्या काळामध्ये अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत नसल्याने भाविकांच्या मागणीनुसार आजपासून मुख दर्शन सुरू करण्यात आलं आहे.
साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन
साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शनSaamTV

शिर्डी : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साई भक्तांना आनंदाची बातमी आहे साईबाबांच्या (Saibaba) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आजपासून मूखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरतीच्या व्यतिरिक्त मूख दर्शन भाविकांना घेता येणार आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत 7 ऑक्टोबरला साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

15 हजार भाविकांना ऑनलाइन पास (Online Pass) द्वारे साई मंदिरात प्रवेश दिला जातोय तर भाविकांच्या मागणीनुसार 10 हजार ऑफलाइन पास भाविकांना दिले जातात त्यामुळे दिवसभरात 25 हजार भाविक साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेत आहे.

साईभक्तांसाठी खुशखबर... आजपासून मिळणार साईबाबांच मुखदर्शन
Nagpur School : नागपूरमधील शाळा आजपासून गजबजणार

गर्दीच्या काळामध्ये अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत नसल्याने भाविकांच्या मागणीनुसार आजपासून मुख दर्शन सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आजपासून मूख दर्शन घेता येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com