Republic Day 2023 : राजपथावर नारीशक्तीचा जागर! महाराष्ट्राच्या चित्ररथात दिसणार साडेतीन शक्तिपीठे

प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. प्रत्येक राज्यातून राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी चित्ररथाची जोरदार तयारी सुरू आहे.
साडेतीन शक्तिपीठे: Republic Day 2023
साडेतीन शक्तिपीठे: Republic Day 2023Saamtv

Maharashtra Chitrarath 2023: प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. प्रत्येक राज्यातून राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी चित्ररथाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगूंटीवार यांनी राजपथावर यंदा महाराष्ट्राकडून साडेतीन शक्तिपीठांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या चित्ररथातून नारीशक्तीचे दर्शन घडवले जाईल, अशी माहिती दिली आहे. (Delhi)

साडेतीन शक्तिपीठे: Republic Day 2023
Goa bound flight Security Threat : खळबळ! गोव्याला २४५ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानात बॉम्बच्या धमकीचा फोन

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनी (Republic Day) दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार असून यावर्षी राज्यातील साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर अशी संकल्पना असणार आहे.

सध्या नवी दिल्लीत हे चित्ररथ तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याबद्दलची सविस्तर माहिती सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्रिय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधला असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिला आहे.

साडेतीन शक्तिपीठे: Republic Day 2023
Eknath Shinde On Sharad Pawar: शरद पवार मला नेहमी फोन करतात; CM शिंदेंनी बरंच काही सांगितलं, कौतुकही केलं

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संंबंध देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com