
छत्रपती संभाजीनगर शहरातील हडकोमध्ये भरधाव कार आणि स्कुटीचा भीषण अपघात झालाय. भरधाव कारने एक दुचाकीला उडवलं. या धडकेनंतर दुचाकी गोळीच्या वेगाने इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली. यानंतर स्कुटीने पेट घेतला असून त्यात टू व्हिलर जळून खाक झालीय. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडकोमध्ये भरधाव कारने स्कुटीस्वाराला उडवल्याची घटना घडलीय. शहरातील हडको एन-12 भागातील ही घटना आहे. भरधाव कारने स्कुटीस्वाराला जोरदार उडवलं. त्यानंतर स्कुटी इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली. त्यात मोठा स्फोट होऊन स्कूटीला आग लागली. त्यात स्कूटर जळून खाक झालीय.
या घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून कार घेऊन पसार झाला. दरम्यान हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या अपघातामध्ये महावितरणचा पोल अक्षरशः वाकला. यात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संभाजीनगर शहरातील हडकोमधील एका रस्त्याच्या यु-टर्नच्या ठिकाणी हा अपघात घडला. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावर वाहनांची वर्दळ चालू आहे. एका दुचाकीनंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने एक स्कुटीवाला यु-टर्न घेताना दिसतोय. त्याचेवळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक भरधाव कार येते.
ही कार निळ्या रंगाची आहे. स्कुटीवाला वळत असतानाच भरधाव कार त्याला उडवते. या धडकेने दुचाकीस्वार खाली पडतो. तर दुचाकी गोळीच्या वेगाने उडत एका इलेक्ट्रिक पोलला धडकते. या धडकेत इलेक्ट्रिक पोल अर्ध्यातून वाकतो. त्यातून इलेक्ट्रिक स्पार्क झाल्यानंतर दुचाकी पेट घेते. या आगीत स्कुटी जळून खाक झाली.
सुदैवाने दुचाकीस्वारला जास्त इजा झाली नसून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला उठवतात. त्यानंतर कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु कार चालक कार अजून जास्त भरधाव वेगाने पळून तेथून पसार झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.