Sanjay Raut On Suraj Chavan: उद्धव ठाकरे गट-राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक; संजय राऊतांच्या विधानावरून NCP नेता भडकला!

Sanjay Raut On Sharad Pawar Announcment: सामनाच्या अग्रलेखात देखील शरद पवारांच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
Sanjay Raut On Suraj Chavan
Sanjay Raut On Suraj ChavanSaam TV

Samna Editorial New: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी मोठा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यावेळी अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सामनाच्या अग्रलेखात देखील शरद पवारांच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करत अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. (Latest Political News)

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले 'खिलाडी' आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते.

Sanjay Raut On Suraj Chavan
Arthur Road Jail Crime News: कारागृहात कैद्यासोबत घडलं लाजिरवाणं कृत्य; आर्थररोड जेलमधील चित्तथरारक घटना

अडीच वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल, अशा शब्दांत अजित पवारांना सामनातून टोला लगावला आहे.

सामना अग्रलेखात अजित पवारांविषयी असं भाष्य केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण ठाकरे गटावर चांगलेच भडकले आहेत. " संजय राऊत यांनी आमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा तपासण्यात पेक्षा आपल्या पक्षाचा दर्जा तपासावा. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले.

Sanjay Raut On Suraj Chavan
Crime News: ज्याच्या विरोधात गँगरेपचा गुन्हा दाखल केला, त्याच्यासोबतच महिलेने ठोकली धूम

आमची भाकर करपली म्हणणापेक्षा तुमची भाकर आणि चूल कुठेगेली ते बघा. आमचे सहकारी भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहेत, असे म्हणता पण एकनाथ शिंदे यांना भाजपाने पळून नेले त्यावर लक्ष ठेवले पाहिजे होते, असं शब्दांत संजय राऊतांना (Sanjay Raut) ठणकावून सांगितलं आहे.

यावर राऊतांनी देखील सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यात त्यांनी म्हटलंय की, " इतर सुद्धा वृत्तपत्राचे अग्रलेख आहेत. सामनाचा अग्रलेख वाचला असेल तर शेवटपर्यंत वाचा नुसत्या प्रतिक्रिया देऊ नका. त्यामध्ये पवार साहेबांच्या निर्णयाचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. आम्ही आमच्या भूमिका वृत्तपत्रात मांडायच्या नाहीत का?, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच इतर वृत्तपत्राचे अग्रलेख वाचता आले तर ते वाचा. वाचायला शिका वाचाल तर वाचाल, असा सल्ला देखील राऊतांनी सुरज चव्हाण यांना दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com