Saam Impact: भररस्त्यात महिलेची प्रसूती, नाळ दगडाने तोडली; दोषींवर कठोर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Tribal Woman Delivers Baby on Road: जळगावमध्ये एका आदिवासी महिलेची रस्त्याच्या कडेला प्रसूती झाली. या महिलेला वेळेत रुग्णवाहिका आणि वैद्यकिय उपचार मिळाले नाही. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे.
Saam Impact: भररस्त्यात महिलेची प्रसूती, नाळ दगडाने तोडली; दोषींवर कठोर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Tribal Woman Delivers Baby on Road,Saam Tv
Published On

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसुती झाली होती. सामच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. चोपडा तालुक्यातील बोरमडी गावातल्या महिलेची रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय मदत न मिळाल्याने रस्त्यावर प्रसुती झाली होती. त्यासंदर्भात साम टीव्हीनं आवाज उठवताच प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी थेट त्या महिलेचं घर गाठत तिची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झेडपीच्या सीईओ आणि आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी आले होते. दरम्यान 'याप्रकरणात कुणाचीही हयगय केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.', असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.

जळगावच्या चोपडा तालुक्यात बोरमडी येथे आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना समोर आली होती. महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांना फोन केला. पण तब्बल अर्धातास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका आली नाही.

शेवटी प्रसुती कळा वाढल्यामुळे महिलेच्या पतीने तिला दुचाकीवरून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना या महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला आणि तिने भररस्त्यातच बाळाला जन्म दिला.

Saam Impact: भररस्त्यात महिलेची प्रसूती, नाळ दगडाने तोडली; दोषींवर कठोर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Jalgaon News : गाडी जरा बाजूला थांबवा; बाईकवरुन उतरली अन् २० वर्षीय विवाहितेनं नवऱ्यासमोर विहिरीत उडी घेतली

यावेळी काही महिला मदतीसाठी आल्या. या महिलांनी प्रसुती करताना साहित्य नसल्याने चक्क दगडाच्या सहाय्याने नाळ तोडल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा चोपडा हा मतदार संघ आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री असताना महिलेला अशा पद्धतीने प्रसुती होण्याची वेळ आली असेल तर यापेक्षा वाईट ते काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसुती झाल्याचे कळताच आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स, आशा वर्कर, पारिचारिका या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी केली.

Saam Impact: भररस्त्यात महिलेची प्रसूती, नाळ दगडाने तोडली; दोषींवर कठोर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Jalgaon Video: जुन्या वादातून टोलनाक्यावर दोन गटात जोरदार हाणामारी, आठ जण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com