खड्ड्यांनी घेतला तरूणाचा जीव; घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मुंडन आंदोलन

दिवा आगासन रोडवर एका निष्पाप तरूणाचा खड्ड्यांमुळे जीव गेला. यांच्या निषेधार्थ मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवा प्रभाग समितीच्या समोर मुंडन आंदोलन करण्यात आले आहे.
rpi news
rpi news saam tv
Published On

दिवा : दिवा आगासन रोडवर एका निष्पाप तरूणाचा खड्ड्यांमुळे जीव गेला. यांच्या निषेधार्थ मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवा (Diva) प्रभाग समितीच्या समोर मुंडन आंदोलन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सौरव आढांगळे यांनी मुंडन करून ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला आहे. वाढत्या अपघाताच्या घटना आणि मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे दिव्यात आता भाजपा आणि मनसे सोबत रिपब्लिकन पार्टी देखील रस्त्यावर उतरली आहे.

rpi news
Satara Breaking News : उद्याेजकानं लॉकअपमध्ये केला आत्महत्येचा प्रयत्न; उपचारासाठी पुण्याला हलवलं

दिवा आगासन रोड वरील खड्डा चुकवत असताना एका तरुणाला रविवारी आपले जीव गमवावे लागले आहे. मात्र या तरुणाच्या जीवावर बेतलेले खड्डे हे मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्यामुळे निर्माण झाले आहेत. याच विरोधात भाजपाने मुंब्रा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर मनसेचे अभियंत्याच्या निलंबनाची मागणी केली असताना आता दिव्यात आरपीआय देखील आक्रमक झाली आहे. आरपीआयच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

rpi news
Ganeshotsav 2022 : उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं आवश्यक; मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

अनिकेत पाटील युवक आघाडी अध्यक्ष दिवा विभाग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. अनिकेत पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेला इशारा दिला कि गणेश पाले यांचे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर याचे पुढील आंदोलन उग्र स्स्वरूपाचे असेल असा इशारा दिला आहे. मृत गणेश फाले यांचे कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी वमुख्यमंत्र्यांनी १० लाखाची मदत त्याच्या कुटुंबाला करावी, अशी मागणी मंगळवारी रिपब्लिकन पक्षाचे वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com