Rojgar Hami Yojana: काय थट्टा चालवली आहे?; रोजगार हमीच्या कामावर फक्त 5 रुपये मजुरी...

Maharashtra Rojgar Hami Yojana: सदर गावातील कामावर 577 स्त्री पुरुष मजूर उपस्थित होते.
Rojgar Hami Yojana
Rojgar Hami YojanaSaam tv
Published On

शुभम देशमुख

Rojgar Hami Yojana: शासनाकून मजुरांची थट्टा करणारी एक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी पंचायत समिती अंतर्गत पिंपळगाव सडक येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मामा तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम दिनांक 14 ते 20 मे पर्यंत सुरू होते. सदर गावातील कामावर 577 स्त्री पुरुष मजूर उपस्थित होते. (Latets marathi News)

त्यांच्याकडून गाळ काढण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मजुरांना त्यांची केलेल्या कामाच्या बदल्यात 5 ते 7 रुपये मजुरी देण्यात आलेत. अल्प मोबदला देऊन मजुरांची थट्टा केल्याच्या आरोप होत आहे.

Rojgar Hami Yojana
Delhi Crime News : अल्पवयीन मुलीसोबत घडली संतापजनक घटना! समोर आली धक्कादायक प्रतिक्रिया

उन्हाळ्यात ग्रामीण भागात रोजगार राहत नाही. त्यामुळे नागरीक स्थलांतर करीत कामाच्या सोधात शहराकडे धाव घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच काम उपलब्ध व्हावे म्हणुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली.

त्यामुळे प्रत्येक हाताला काम मिळते. पण आता याच रोजगार हमीच्या कामात मजुरांची थट्टा होत असल्याच पाहायला मिळतं आहे. लाखनी तालुक्यात मागील आठवड्यात केंद्र सरकारचे काही अधिकारी लाखनी पंचायत समितीत आले व दुपारच्या वेळेस पिंपळगाव येथील रोजगार हमीच्या कामावर पाहणी करण्यासाठी ते आले होते.

Rojgar Hami Yojana
Mohite Patil on Gautami Patil: गौतमीला संपवू नका...; दिलीप मोहिते पाटलांचे राज्यकर्त्यांना आवाहन

मात्र रोजगार हमीची वेळ उष्णतेमुळे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत असून सदर कामावर काही मजूर अनुपस्थितीत दिसून आले. तसेच काही मजूर पिंपळगाव टोली इथेच रहिवासी असून ते कामावर उपस्थित होत. त्यामुळे जे मजूर अनुपस्थित दिसले त्यांची मजुरी 5 ते 7 रुपये कापण्यात आली. त्यामुळे मजूर वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर शासनाच्या नियमानुसार 247 रूपये मोबदला द्यावा असे असून सुध्दा मजुरांची थट्टा करण्यात आली आहे. त्यामुळे मागेल त्याला काम असे ब्रीद वाक्य खोटे ठरताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com