Rohit Pawar : अजित पवार गटाकडे स्वायतता राहिली नाहीये: रोहित पवार

Rohit Pawar On Fadnavis Letter: नवाब मलिकांनी महायुतीतील प्रवेश केल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. विरोधकांनी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून निर्णय बदलण्यास सांगितले. यावरुन टीका करताना रोहित पवारांनी अजित पवार यांच्या गटातील नेत्यांच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित केला.
Rohit Pawar
Rohit Pawarsaam Tv
Published On

(चेतन व्यास)

MLA Rohit Pawar slams Ajit Pawar Group :

नवाब मलिक यांच्या महायुतीच्या प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र लिहिले. या पत्र व्यवहाराच्या वादात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतलीय. महायुतीत मलिक यांनी प्रवेश केल्यानंतर रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवार गटावर टीका केलीय. ते वर्ध्यातील संघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते. (Latest News)

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामुळे चर्चेत राहिला. नवाब मलिक हे अजित पवार गटात आल्यानंतर विरोधकांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित मलिकांच्या महायुतीतील प्रवेशाला विरोध केला. विरोधकांनी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून निर्णय बदलण्यास सांगितले. यावरुन टीका करताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील नेत्यांच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ध्यातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होते आणि नवाब मलिक हे भाजपा विरोधात बोलत होते. ते भाजपविरोधात नवाब मलिक बोलत होते. त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी त्यांना देशद्रोही आणि बरंच काही बोलले. या दरम्यान त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि अनेक अडचणी सोसाव्या लागल्या.

आज जेव्हा बऱ्याच वर्षांनी नवाब मलिक हे अधिवेशनात आले आणि तिथे जेव्हा ते सत्तेच्या बाकावर जाऊन बसले. तेव्हा सकाळी भाजपच्या एकही व्यक्तीने त्याच्याबाबतीत कोणी काही बोललं नाही. पण जेव्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली मग कुठे जाऊन हे सर्व जागे झाले. मग खोटे आरोप केले असले तरी मग आता लोक बोलताय म्हणून त्यांनी एक साधं पत्र काढलं. ते पत्र कोणाला दिलं तर मित्र मंडळाला, यामुळे यातून एक कळतंय की मित्र मंडळाकडे स्वायतता राहिलेली नाहीये.

आता निर्णय नवाब मलिक आणि अजित पवार मित्रमंडळ आणि त्यांच्या मंत्र्यांना घ्यायचा आहे. त्यांनी निर्णय घेतल्यावर बघू की भूमिका काय घेताय ते. अशा परिस्थितीत स्वाभिमानपण महत्वाचं आहे, जर नुसतं कुठेतरी दुसऱ्या कोणत्या पक्षाकडून तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातं असेल. तुम्ही घेतलेला निर्णय जर दुसऱ्या पक्षाचा नेता येऊन जर बदलण्यासाठी सांगत असेल तर तुमच्या मंडळाची स्वायतता तिथे राहत नसेल. तर तो निर्णय मित्रमंडळाच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. आम्हाला त्याच काही देणं घेणं नाहीये, असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.

Rohit Pawar
Maharashtra Politics: 'सत्तेपेक्षा देश महत्वाचा..' नवाब मलिकांना महायुतीत 'नो एन्ट्री'; फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com