Rohit Pawar : शरद पवार वस्तादासारखे शेवटचा डाव राखून ठेवतात; रोहित पवारांचा सूचक इशारा कोणाला?

Rohit Pawar latest News : प्रचारसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांकडूनही शरद पवार गटावर टीका केली जात आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकांना आता रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Rohit Pawar  Mla
Rohit Pawar Mla Saam Tv

सोलापूर : राज्यात काही लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी इतर लोकसभा मतदारसंघात बैठक-सभांचा धडाका लावला आहे. राज्यातील इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रचारसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांकडूनही शरद पवार गटावर टीका केली जात आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकांना आता रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'शरद पवार वस्तादासारखे शेवटचा डाव राखून ठेवतात, असं बोलत रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. करमाळा येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेत आमदार रोहित पवार बोलत होते.

Rohit Pawar  Mla
Surat lok sabha : सूरत लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; NOTAला उमेदवार माना, सुप्रीम कोर्टात याचिका

रोहित पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील करमाळ्यातील सभेत रोहित पवारांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. 'पवार साहेब हे छोटे मोठे नव्हे. तर फार मोठे वस्ताद आहेत. अनेक पैलवान पवार साहेब यांनी तयार केले. त्यातील काही पैलवानांना एखादी-दुसरी कुस्ती जिंकल्यावर आपण मोठे पैलवान झाल्यासारखे वाटले. असे पैलवान शेवटी वस्तादासोबतच कुस्ती खेळू लागले. पण त्यांना आपल्याला सांगायचे आहे की वस्ताद हा शेवटचा डाव नेहमी राखून ठेवतो, असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं.

Rohit Pawar  Mla
Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज

'या निवडणुकीत आपल्या विचाराला सोडून गेलेले लोकांना पवार हे राजकीयदृष्ट्या चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असे विधान आमदार रोहीत पवार यांनी केले. त्यामुळे शरद पवार यांना सोडून गेलेल्या अजित पवार गटाला रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. यावेळी तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर माजी आमदार नारायण पाटील यांना धोका दिला. तानाजी सावंत म्हणजे खेकडा, अशा शब्दात रोहीत पवार यांनी सावंत यांच्यावर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com