Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar Speech Karjat- Jamkhed: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP Leader Sharad Pawar on Rohit PawarSaam TV
Published On

सुशिल थोरात|अहमदनगर, ता. २९ सप्टेंबर

Sharad Pawar On Rohit Pawar CM Candidate: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन दावे- प्रतिदावे आणि खडाजंगी सुरु आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. २९ सप्टेंबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात खर्डा येथील शिवपट्टण किल्ला जतन व संवर्धन, वखार महामंडळ गोदाम बांधकाम,खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले.

"मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची असेल. असे सर्वात महत्वाचे विधान शरद पवार यांनी केले. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांचे हे विधान म्हणजे रोहित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी तर नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Sharad Pawar News: रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे सर्वात मोठे विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Election : आगामी निवडणुकीत राखीव मतदारसंघ आणि महिला मतदारांची संख्या किती? आयोगाने दिली महत्वाची माहिती, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com