Rohit Pawar: अरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar On Ajit Pawar Death: रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी माहिती देताना आणखी एक खळबळजनक दावा केला. नरेश अरोरांच्या कंत्राटावरून अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वाद झाला होता, असे ते म्हणाले.
Rohit Pawar: अरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar And Rohit PawarSaam Tv
Published On

Summary -

  • नरेश अरोरांच्या कंत्राटावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद झाल्याचा आरोप

  • अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे रोहित पवारांनी घेतली

  • या वादामुळे अजित पवार यांना जाण्यासाठी उशिरा झाला त्यामुळे ते विमानाने गेले

  • २७ ते २८ तारखेदरम्यान जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली

नरेश अरोरांच्या कंत्राटावरून अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला होता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. नरेश अरोरांचे कंत्राट रद्द करण्यावरून हा वाद झाला होता असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधीच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. अजित पवार यांना उशिर का झाला होता? यामागचे कारण सांगताना त्यांनी थेट पूर्व विदर्भातील नेत्याचे नाव घेतले होते.

रोहित पवार यांनी अजितदादा-तटकरे अन् पटेलांमध्ये वाद का झाला होता? यामागचे कारण सांगितले. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतील चर्चा तिथे झाली. योगायोग असा की, या पॉलिटिकल कन्सल्टंटने काही महिन्यांपूर्वी विमान विकत घेतले. त्या व्यक्तीचे शेकडो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याची दादांची भूमिका होती. तिथेच कदाचित तो वाद-विवाद झाला. तटकरे तिथे होते. या मुद्द्यावर जिथे दादांची कुठेच इच्छा नव्हती त्यावर वादविवाद झाला. त्यामुळे उशिर झाला. उशिर झाल्याने दादा कारने जाऊ शकले नाहीत आणि २८ तारखेला दुर्दैवी घटना घडली.'

Rohit Pawar: अरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar Death : अजितदादांचा १०० टक्के घातपातच, गुजरात कनेक्शन सांगत रोहित पवारांचा पुराव्यासह दावा, ५ प्रश्नांने महाराष्ट्रात खळबळ

रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, 'नरेश अरोरांच्या कन्सल्टंटची टीम तिथे आली होती. त्यांना सुद्धा दादा त्यांच्या स्टाईलमध्ये झापत होते. २७ तारखेला सुद्धा नरेश अरोरांच्या वतीने त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तसेच ठेवले गेले पाहिजे, त्यांचे शेकडो कोटींचे कॉन्ट्रॅक्ट तसंच ठेवून नरेश अरोरांना तिथे पैसे दिले गेले पाहिजे अशी भूमिका काही नेत्यांची होती. पण त्याविरोधातील भूमिका अजितदादांची होती.' त्यामुळे २७ तारखेपासून ते २८ तारखेपर्यंत काय झालं याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Rohit Pawar: अरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar Death: अजित पवारांचा घातपात झाला, रोहित पवारांच्या संशयावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...

तसंच, 'प्रमोद हिंदूराव हे दादांच्या जवळचे पदाधिकारी आहेत. त्यांनी स्वत:हून सांगितले की, प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला होता. त्यांची कुठली तरी फाईल तिथे होती. फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला. म्हणून दादा कारने जाणार होते. त्यांना कारने न जाता विमानाने जावे लागले. त्यांची लोकं देखील बोलायला लागले आहेत. त्यामुळे दादांच्या बाजूने आज कुणीतरी बोलतेय हे बघून आनंद झाला. गेल्या ४ महिन्यांमध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण काही पदाधिकारी मोठ्या लेव्हलचे, देशपातळीवरचे, राज्य पातळीवरचे हे दादांच्या बाजूने बोलत नव्हते आणि दादांसोबत प्रचाराला फिरत नव्हते.', असे रोहित पवारांनी सांगितले.

Rohit Pawar: अरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rohit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद; रोहित पवारांची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com