पवईतल्या आरए स्टुडिओमध्ये अपहरण नाट्याचा धक्कादायक प्रकार घडला... एका साध्या कास्टिंग कॉलपासून सुरू झालेली ही घटना पुढे काही मिनटात धक्कादायक वळणापर्यंत पोहचली...17 मुलांसह 2 मोठ्यांचं अपहरण रोहित आर्यनं केलं होतं..
ओलीसनाट्याचा घटनाक्रम
सकाळी 10 वा.
ऑडिशन्ससाठी मुलं RA स्टुडिओत प्रवेश
----
दुपारी 1.30 वा.
मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यानं पालकांकडून विचारणा
----
दुपारी 1.40 वा.
मुलांना ओलीस ठेवल्याची सुरक्षा रक्षकाकडून पालकांना माहिती
दुपारी 2 वा.
पवई पोलीस आणि ब्लॅक कमांडो घटनास्थळी दाखल
पारी 2.15 वा.
रोहित आर्यकडून मागण्यांबाबतचा व्हिडिओ जारी
----------
दुपारी 3 वा.
पोलिसांचा बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश
----------------
दुपारी 3.15 वा.
पोलिसांसोबतच्या चकमकीत रोहित जखमी
-----------.
दुपारी 4 वा.
ओलिस ठेवलेल्या सर्व 19 जणांची सुटका
----------------
दुपारी 4.30 वा.
जखमी रोहित रुग्णालयात, डॉक्टरांकडून मृत घोषित
---------------
रोहितनं अत्यंत शिताफीन या सगळ्या अपहरणाचं नाट्य रचलं होतं....ज्या मुलांना ऑडिशनसाठी आणलं होतं त्यांची दिशाभूल करून त्यांना अॅक्टिंग करण्यासाठी अपहरणाचीच स्किप्ट देण्यात आल्याचं एका मुलानं सांगितलेल्या आपबितीतून संमोर आलंय
रोहित आर्यनं मुलांना अपहरणाच्या अभिनयाचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला .आणि त्यानंतर प्रशासनाकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धमकावलं.. मात्र त्यावेळी रोहित आर्यसोबत रोहन आहेर नावाचा त्यांचा जुना सहकारी तरुणही तिथे होता...त्याच्यासाठीही हा मोठा धक्का होता.
दरम्यान रोहितच्या एन्काऊंटरनंतर स्टुडिओतून पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्यूशन आणि लायटर सारख्या वस्तु जप्त केल्या आहेत... आता याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून घटनास्थळाहून जप्त करण्यात आलेल्या वस्तू पोलिसानी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...त्यामुळे येत्या काही दिवसात या थरारनाट्याबाबत आणखी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.