
- तबरेज शेख
Nashik Crime News : पेठरोड - मखमलाबाद लिंक रोडवरील समर्थ नगराजवळील मोकळ्या जागेत खून झालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. ऋषिकेश दिनकर भालेराव (rishikesh bhalerao) (१९, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर, नाशिक) असे हत्या झालेल्या तरुणाचे (youth) नाव आहे.
शनिवारी सकाळी हमालवाडीजवळील आरके होरायझन बिल्डिंगसमोरील जागेत एका तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. पाेलिसांनी पाहणी करुन पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात (hospital) दाखल केला होता.
या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी मनुष्य मिसिंगच्या नोंदींचा तपास केला. तेव्हा ऋषिकेश बेपत्ता असल्याचे शनिवारी रात्री उशिरा आढळून आले. पंचवटी पोलिसांनी त्याच्या नातलगांना बोलावून घेत मृतदेह दाखविला. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली.
ऋषिकेश सातपूर येथील एका कंपनीत कंत्राटी म्हणून कामाला जात होता. कामातही त्याचे जास्त लक्ष नव्हते. त्याला विविध प्रकारची नशा करण्याचे व्यसन जडले होते. त्याची पार्श्वभूमी सामान्य असल्याचे समोर येते आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अनोळखी मारेक-यांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.
मृत ऋषिकेशची ओळख पटल्याने त्याची हत्या कुणी व का केली, याचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित ओळखीचे तसेच अन्य काही संशयितांची चौकशी सुरू आहे. यातील काही संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. पंचवटीच्या रेकॉर्डवरील काही गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिस (police) निरीक्षक युवराज पत्की तपास करत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.