'20 वर्षांपासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ पक्षकार्यामुळे काम-धंदा शोधला नाही, पक्ष काही देत नाही; आता राजीनामा'

'निवडणुकामध्ये बूथ कमिट्या सांभाळल्या, प्रचार केला. अगदी तारुण्यात पदार्पण केल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. स्वतःच्या किंवा कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा एखादा मार्ग शोधावा असे पक्षकार्यामुळे सुचले नाही.'
NCP
NCPमाधव सावरगावे

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात वीस वर्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मला काहीही मिळालेले नाही. लोक तुम्हालाच तुमचा पक्ष काही देत नाही तर आम्हाला काय देणार ? असा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी भवनच्या परिसरात उपहारगृहासाठी किमान जागा उपलब्द करून द्यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे केलीये. अमोल दांडगे असे त्या पदाधिकाऱ्याचे नाव असून ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी (City District Working President of the Nationalist Students Congress) आहे. अमोल दांडगे यांनी जयंत पाटील यांना निवेदन पाठवले आहे. त्या निवेदनात त्यांनी खंत व्यक्त केलीय.

2003 पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. अमोल यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. केले आहे. निवडणुकामध्ये बूथ कमिट्या सांभाळल्या, प्रचार केला. अगदी तारुण्यात पदार्पण केल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. स्वतःच्या किंवा कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा एखादा मार्ग शोधावा असे पक्षकार्यामुळे सुचले नाही.

आता मात्र पक्ष काहीच देत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे उदनिर्वाहाची चिंता सतावत आहे. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विद्यार्थी आघाडीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ज्या राष्ट्रवादी भवनमध्ये (NCP Bhavan) आम्ही पक्षसेवा केली त्या ठिकाणी किमान चहा, नाष्टा, उपहारगृहासाठी किमान जागा द्यावी. ते चालविण्याची परवानगी द्यावी अशी विनंती आपण पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पहा -

स्वतःच्या मनासारखे पद, निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही की बंडखोरी करून इतर पक्षाशी घरोबा करणे हे काही नवीन नाही. आपला कार्यकर्ता आपली विचारधारा हे सगळं बाजूला ठेवून स्वतःच्या भल्यासाठी नेते इकडून तिकडे उड्या मारत असतात. पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अमोल दांडगे (Amol Dandge of NCP Youth Congress) यांनी चक्क राजकारणात राहून पोटापाण्याची सोय होत नाही. असे लक्षात आल्याने राजीनामा दिला आहे.

आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता, अशी अरविंद जगताप यांच्या 'झेंडा' सिनेमातील गीताप्रमाणे भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. कार्यकर्ते हेच आमचे बलस्थान असे सर्वच पक्षांची नेतेमंडळी म्हणतात. पण कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेणारे नेते दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे नेत्यांच्या मागे धावत सुटणाऱ्यांची अवस्था बिकट होत आहे. अमोल दांडगे त्याचेच एक उदाहरण आहे. ते वीस वर्षांपूर्वी राजकारणात आले. पक्ष, नेत्यांची सेवा करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. नेताजी आपल्या पोटापाण्याची काहीतरी सोय करतील, या आशेवर पाठपुरावाही केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. राजकारणात राहून उदरनिर्वाहाकडे दुर्लक्ष केल्याची चूक भोवल्याचं सांगत उर्वरित आयुष्यातील जगण्यासाठी तो धडपड करतोय.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com