Akola : गुंठेवारी खरेदी- विक्री व्यवहारासाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक; अकाेल्यातील निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन

Uddhav Thackeray Faction : अकाेला महापालिकेद्वारे गुंठेवारी क्षेत्र नियमाकूल करण्यात येत नाही ताेपर्यंत खरेदी-विक्री बंदचे आदेश दिल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
reopen gunthewari dealing demands uddhav thackeray faction in akola
reopen gunthewari dealing demands uddhav thackeray faction in akolaSaam Digital

- अक्षय गवळी

अकोला महानगरपालिका ह‌द्दीतील गुंठेवारी खरेदी विक्री चालू करावी या मागणीसाठी आज (गुरुवार) उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्याने नागरिकांची माेठी अडचण झाल्याचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी नमूद केले. (Maharashtra News)

अकोला महानगरपालिका क्षेत्रात जुने शहर तसेच ह‌द्द‌वाढीनंतरचा भाग यामध्ये खूप जास्त प्रमाणात गुंठेवारीच्या जमिनी आहेत. गुंठेवारी प्रकरणाची खरेदी विक्री बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोरगरीब नागरिकांच्या भूखंड खरेदी विक्री बंद आहेत.

reopen gunthewari dealing demands uddhav thackeray faction in akola
Saam Impact : 'साम'च्या बातमीचा दणका! प्रशासन खडबडून जागं, 15 फेरीवाल्यांवर BMCची कारवाई!

त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गुंठेवारी खरेदी विक्री तात्काळ चालू करण्यात यावी अशी मागणी करीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिश्रा म्हणाले जिल्हाधिकारी यांनी सहायक जिल्हा निबंधक यांना गुंठेवारी क्षेत्राचे खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले विविध आदेशाचे पालन करावे असे म्हटले आहे. तसेच अकाेला महापालिकेद्वारे गुंठेवारी क्षेत्र नियमाकूल करण्यात येत नाही ताेपर्यंत खरेदी-विक्री बंदचे आदेश दिल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

reopen gunthewari dealing demands uddhav thackeray faction in akola
Success Story: पारंपारिक शेतीला बगल देत युवा शेतक-याने शेवगा शेतीतून कमविला लाखाेंचा नफा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com