Milk Price : 'रयत क्रांती' ने रस्त्यावर दूध ओतून सरकारचे वेधले लक्ष, पंढरपूरात छेडले आंदाेलन (पाहा व्हिडिओ)

Rayat Kranti Sanghatana : या आंदाेलनात शेतकरी देखील माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
pandharpur, rayat kranti sanghatana, milk price
pandharpur, rayat kranti sanghatana, milk pricesaam tv
Published On

Pandharpur News : राज्य सरकारने दूध खरेदीत वाढ केली आहे. परंतु खाजगी दूध संघ चालक दूधाची केलेली दरवाढ देत नाहीत असा आराेप करीत आज (शनिवार) रयत क्रांती संघटनेने पंढरपुरात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. (Maharashtra News)

pandharpur, rayat kranti sanghatana, milk price
Bullock Cart Race Lovers : लाखमाेलाच्या 'लक्ष्या' ला गावक-यांचा भावपूर्ण निराेप, आरोटे कुटुंबियांना अश्रू अनावर

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारने दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत राज्य शासनाने आदेश देखील काढला. परंतु खाजगी दूध संघ चालक दूधाचा वाढीव दर देणार का असा प्रश्न उपस्थित झाला हाेता. ही शंका दूर हाेण्यापुर्वीच खासगी दूध संघ चालकांनी जादा दर देण्यास असर्मथता दर्शवली. त्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.

pandharpur, rayat kranti sanghatana, milk price
Parbhani News : कोरोना काळातील आर्थिक अनियमितता भाेवली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे निलंबित

खाजगी दूध संस्था चालकांचा निषेध म्हणून आज (शनिवार) पंढरपूरात रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. हे आंदाेलन क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदाेलनात शेतकरी देखील माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com