Ravikant Tupkar Health: अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Ravikant Tupkar Health News: अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे.
Ravikant Tupkar Health Updates
Ravikant Tupkar Health Updates Saam Tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Ravikant Tupkar Health Updates

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. राज्य सरकार सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर तुपकरांनी बुधवारी आंदोलन मागे घेतलं. कर्जत येथे सोबत आलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी महिलांच्या हातून दोन चमचे खिचडी देखील खाल्ली. दरम्यान, अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ravikant Tupkar Health Updates
Police Action: गजबजलेल्या कॅफेवर अचानक पोलीस धडकले; प्रेमीयुगुलं रंगेहाथ पकडली, अनेकांची पळापळ

अचानक अस्वस्थ जाणवू लागल्याने तुपकर यांना मुंबईतील (चर्नी रोड) सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून तुपकर लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत.

रविकांत तुपकर यांचा ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल कमी झाली आहे, याशिवाय त्यांच्या किडनीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात आंदोलन सुरू केलं होतं.

कापूस सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. सलग ५ दिवस त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. यादरम्यान, त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती. रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल. मात्र मी आंदोलनावर ठाम आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, असं तुपकरांनी म्हटलं होतं.

दरम्यान, तुपकर हजारो कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांसह मुंबई दाखल झाले होते. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर मंत्रालय बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर तुपकरांनी आंदोलन मागे घेतलं होतं. सरकारने आपल्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या उर्वरीत मागण्यांसाठी आम्ही १५ दिवसांचा वेळ दिला आहे. असंही तुपकर म्हणाले होते.

Ravikant Tupkar Health Updates
Uddhav Thackeray: शेती नुकसानीबाबत आवाज उठवा, सरकारला जाब विचारा; उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय सूचना दिल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com