CNG Shortage : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लागल्या रांगा 

Ratnagiri News : मागील काही वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात देखील सीएनजी इंधनाचे पंप पडले असून याठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे
CNG Shortage
CNG ShortageSaam tv
Published On

अमोल कलये

रत्नागिरी : पेट्रोल, डिझेलचे दर अधिक असल्याने सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सीएनजी इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशातच सीएनजी मिळवण्यासाठी कशा प्रकारे वाहनांच्या लांबचलांब रंग लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

CNG Shortage
Sambhajinagar News : मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मागील काही वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने (CNG) सीएनजी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात देखील सीएनजी इंधनाचे पंप पडले असून याठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. साधारण गेल्या महीनाभरापासून (Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात काही मोजकेच सीएनजी पंप असल्याने सर्व पंप आँफलाईन असल्याने सीएनजी पुरवठा वेळेत होत नसल्याने हा तुटवडा जाणवत आहे. राजापूरमध्ये सीएनजी स्टेशनवर चारचाकी गाड्यांसाठी भलीमोठी लाईन पाहायला मिळतेय. तर त्यापेक्षा अधिक रिक्षा व्यवसायिकांची सुद्धा लाईन पाहायला मिळतेय. सीएनजीसाठी लागलेल्या या राजापूरमधील लाईनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हियरल होतोय.

CNG Shortage
Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

सध्या उन्हाळी सुट्या आहेत. यामुळे पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान पर्यटक आणि चाकरमानी आल्याने सीएनजी भरण्यासाठी गर्दी होत आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Mumbai Goa Highway) मुंबई- गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये एकच सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पहायला मिळत आहे. प्रामुख्याने रिक्षा व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com