Parshuram Ghat: परशुराम घाटातील वाहतूक एक आठवड्यासाठी बंद; काम जलदगतीने करण्यासाठी कंपनीची मागणी

परशुराम घाटातील वाहतूक एक आठवड्यासाठी बंद; काम जलदगतीने करण्यासाठी कंपनीची मागणी
Parshuram Ghat
Parshuram GhatSaam tv

जितेश कोळी

रत्नागिरी : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे; यासाठी (Ratnagiri) ठेकेदार कंपनीने महामार्ग बंद करण्याची मागणी केली आहे. त्‍यानुसार परशुराम घाटातील (Parshuram Ghat) वाहतुक बंद राहणार आहे. (Tajya Batmya)

Parshuram Ghat
Dhule News: सॅनिटरी पॅडचा आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी मुद्देमाल केला जप्‍त

परशुराम घाट हा एकूण पाउणे तीन किलोमीटरचा असून यापैकी फक्त ५०० मिटरचे चौपदरीकरणाचे काम शिल्लक राहिलेले आहे. शिवाय दिड किलोमीटरच्या सुरक्षा वॉलला भरावही करायचा असल्याने हा घाट वाहतूकीसाठी बंद करावा लागणार आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नाही; तर मात्र पावसाळ्यात अर्धवट स्थितीत असलेला घाट पुन्हां वाहतूक करणाऱ्या प्रवाश्यांसाठी डोकेदुखी बनू शकतो.

Parshuram Ghat
IPL Betting: आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा; धाड टाकून पोलिसांची कारवाई

२५ एप्रिलपासून वाहतुक बंद

ठेकेदार कंपनीने घाटातील वाहतूक बंद ठेवण्याच्या केलेल्या मागणीवर राष्ट्रीय महामार्ग विभाग व जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत एक आठवडा घाटातील वाहतूक बंद करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com