

Ratnagiri-Konkan Railway Line Megablock: रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्तवाची बातमी समोर येत आहे. रत्नागिरी-कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते वैभववाडीदरम्यान देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 7.30 ते 10.30 या कालावधीत हा तीन तासांचा मेगाब्लॉक असेल. या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेससह तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
रत्नागिरी ते सिंधुदुर्गातील वैभववाडी या सेक्शनमध्ये घेण्यात येणार्या मेगा ब्लॉकमुळे गाडी क्र. 11003 दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस ही 21 जून रोजी रोहा - रत्नागिरी दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे.
तसेच 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुअनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस उडुपी - कणकवली दरम्यान 3 तासांसाठी रोखून ठेवली जाणार आहे. (Breaking News)
याचबरोबर 21 जून रोजीची गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेस ही सावंतवाडी रोड - कणकवली दरम्यान 30 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. रेल्वेच्या पूर्वनियोजित मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या या तीन गाड्या या विलंबाने धावणार आहेत. (Marathi Tajya Batmya)
मेगा ब्लॉकच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणार्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.