Ration Shopkeepers Strike: राज्यातील रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संपावर; काय आहेत मागण्या?

Maharashtra Ration shopkeepers strike: मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे.
Ration Shopkeepers Strike
Ration Shopkeepers StrikeSaam TV
Published On

Ration Shopkeepers News:

राज्यातील गरजू आणि अर्थिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांना दोळ वेळचं चांगलं जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत कमी पैशांत रेशन पुरवले जाते. रेशनचे धान्य खाणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी आता मोठी बातमी समोर आलीये. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू होणारे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ration Shopkeepers Strike
Ration Subsidy : रेशन ऐवजी अनुदानाचे पावणे पाच कोटी जमा; बीड जिल्ह्यात २४ हजारावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केलेय.

या संपामध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, मार्जिन मनी ३०० रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा. तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत.

ऐन नव वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांची चिंता वाढली आहे. रेशन दुकानदारांच्या या मागण्या सरकार तातडीने पूर्ण करणार का? की यामुळे गरजू नागरिकांना उपाशी पोटी रहावं लागणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Ration Shopkeepers Strike
ED Raid on Bharatkshetra Shop : दादरमधील 'भरतक्षेत्र' दुकानावर ईडीची धाड का पडली? झाडाझडतीत काय सापडलं? सगळं आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com