परभणीत शेतकऱ्यांचे भजन-कीर्तन करत रस्ता रोको आंदोलन
परभणीत शेतकऱ्यांचे भजन-कीर्तन करत रस्ता रोको आंदोलनराजेश काटकर

परभणीत शेतकऱ्यांचे भजन-कीर्तन करत रस्ता रोको आंदोलन

नेत्यांचे पाहाणी दौरे चालू असले, तरी मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
Published on

परभणी: परभणी जिल्ह्यात दोन महिन्यात सलग तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. नेत्यांचे पाहाणी दौरे चालू असले, तरी मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. (Rasta Roko Andolan by chanting hymns of farmers in Parbhani)

हे देखील पहा -

परभणी जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी गंगाखेड-परळी महामार्गावर भजन-कीर्तन करत रस्ता रोको केला. सोनपेठ भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करावी, तसेच या वर्षीच्या पीक विमा मंजूर करून तेही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा. महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

परभणीत शेतकऱ्यांचे भजन-कीर्तन करत रस्ता रोको आंदोलन
कृष्णा काठाला मगरींचा वावर; कोरेगांव-टेंभू परिसरात भितीच वातावरण

तर पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्हातील जीआर प्रमाणे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची यावेळी करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com