कृष्णा काठाला मगरींचा वावर; कोरेगांव-टेंभू परिसरात भितीच वातावरण

महापुरानंतर सांगलीच्या शहरी भागात देखील अनेक जलचर प्राणी आढळून आले होते.
कृष्णा काठाला मगरींचा वावर
कृष्णा काठाला मगरींचा वावरजगदीश पाटील
Published On

कराड : सांगली Sangali मध्ये काही दिवसांपुर्वी आलेल्या महापुरानंतर सांगली शहराच्या अनेक भागात जलचर प्राणी आढळून आले होते. काहींच्या घरावरती देखील मगरी आढळून आल्या होत्या. तेंव्हापासून कृष्णाकाठाला मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याच बोलंल जात असतानाच काल कोरेगांव Koregaon येथील टेंभू Tembhu Project प्रकल्पानजीक जवळपास १० ते १२ फूटाची मगर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.(Crocodile was found near Krishna river)

हे देखील पहा -

टेंभू प्रकल्पाच्या पुढील बाजूस असणाऱ्या कोरेगांवला या मगरीचा धोका असल्याचे बोलले जात आहे. येथील नदीकाढाला शेतीच्या कामासह जनावरांना चरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरेगांव मधील शेतकऱ्यांची वर्दळ असते तसेच गावातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात नदीवरती कपडे धुण्यासाठी येत असतो अशा परिस्थिती मध्ये या नदीमध्ये आढळून आलेल्या मगरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

कृष्णा काठाला मगरींचा वावर
योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार

काल आढळून आलेली ही मगर Crocodile सर्वत्र चर्चेचा विषय ठरली या मगरीची माहीती मिळताच कोरेगांवचे पोलिस पाटील धनाजी सावंत, तसेच वनरक्षक पांढरे साहेब यांनी कृष्णा नदी काठावरती मगर आढळून आलेल्या ठिकाणाला भेट दिली. त्यावेळी देखील मगर तिथेच असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी टेंभू गावचे सरपंच,पोलीस पाटील हे देखील उपस्थीत होते. दरम्यान या मगरीला तात्काळ पकडून तिला वनविभागाच्या हवाली करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com