Loksabha Election: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत महादेव जानकर; म्हणाले, 'भारताच्या पंतप्रधानपदी एक दिवस मी विराजमान होणार'

Phaltan News: कुठल्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ, असा विश्वास महादेव जानकरांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केला आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionSaam tv
Published On

Phaltan News:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या मनातील मोठी इच्छा ठाम विश्वासात व्यक्त केली आहे. "सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागा. कारण विजय आपलाच आहे. कुठल्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होऊ, असा विश्वास महादेव जानकरांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Loksabha Election
PM Modi, Nitish Kumar: यांना लाज नाही...; महिलांबद्दल नितीशकुमारांनी केलेल्या वक्तव्यावर PM मोदी संतापले

महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री गार्डन मंगल कार्यालय बरड (ता. फलटण) येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी येथे उपस्थित होते. यावेळी समारोपाच्या सत्रात मार्गदर्शनावेळी जानकरांनी पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य केलं आहे.

राजकीय विश्लेषक प्रा. मनोज निगडकर यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी महादेव जानकर यांनी महिलांना राजकारणात ५० टक्‍के भागीदारी मिळाली पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडली होती. यासह प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला समान प्रमाणात सर्व क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे, अशी भूमिका महादेव जानकरांची आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, जिल्हा संपर्क प्रमुख, लोकसभा अध्यक्ष, ज्‍येष्‍ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे, राज्यातील सर्व विभाग व सर्व आघाडीचे विभागाध्यक्ष, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय कार्यकारिणी सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

Loksabha Election
Gondia Crime News: 'तुमच्या घरात गुप्तधन आहे, काढून देतो' अशी बतावणी करत 7 लाखांची फसवणूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com