देशात विशिष्ट विचारधारेचा वेगाने प्रसार; साहित्यिकांनी दक्ष राहण्याची गरज - पवार
लातूर : उदगीरमध्ये (Udgir) होणाऱ्या ९५ व्या साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan) उदघाटनप्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी साहित्यिकांना आणि साहित्य रसिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. देशात विशिष्ट विचारधारेचा प्रचार-प्रसार वेगाने होत असल्याचे चित्र आहे, असे मत व्यक्त करताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी हे आवाहन केले आहे. हिटलरचे 'माईन काम्फ' पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे (Media) करण्यात आलेला प्रचार हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
हे देखील पहा :
शरद पवार म्हणाले की, विशिष्ट विचारधारेला (Ideology) पोषक ठरेल अश्या साहित्यनिर्मितीवर आजच्या काळात काही घटकांकडून भर देण्यात येतोय. हा प्रकार म्हणजे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून (Literature) विचारधारा जन्माला येत असतात. याच विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आल्याचेही पवार म्हणाले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत असून, अशा प्रकारची साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देत असून, अराजकता माजवण्यास कारणीभूत ठरत आहे.
जर्मनीचा हुकुमशहा एडॉल्फ हिटलरने (Adolf Hitler) 'माईन काम्फ' (Mine Calf) पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला मतप्रचार हे त्याचे भयानक उदाहरण असल्याकडे ही शरद पवार यांनी लक्ष वेधले. साहित्य हे मुक्त असावे व ते कोणत्याही विचारधारेशी ते बांधील नसावे. कारण, अशा बांधिलकीतून तयार होणारी मतप्रणाली ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहितास बाधा उत्पन्न करणारी असू शकते असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.