Amit Shah : रामराजे निंबाळकरांच्या टीकेमुळे अमित शहांच्या फलटण दाै-याकडे लागले सातारा जिल्हावासियांची लक्ष

रामराजेंच्या विधानाची चांगलीच चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात रंगली आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsaam tv

Satara Political News : खासदारांमध्ये 542 पैकी एकमेव खासदार आहेत ज्यांनी मिक्सर दुरुस्तीत डिप्लोमा केला आहे. अशा लोकांना हिंदुत्व (Hindutva) हा शब्द तरी लिहिता येईल का भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यावर खरमरीत टिका रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केली.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara News : पुण्याची सात फेटेवाला, साता-याची चॅटींग; नट-खट राज्य बाल एकांकिका स्पर्धेत यश

फलटण तालुक्यातील गोखळी येथील कापूस उत्पादकांच्या शेतकरी मेळाव्यात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेतल्या 542 खासदारांपैकी रणजितसिंह हे एकमेव खासदार आहे ज्यांनी हाऊस अप्लायंसेस मेंटेनंन्स डिप्लोमा केला आहे.

हा डिप्लोमा मिक्सर टोस्टर मेंटेनंन्सचा असल्याचे सांगून अशा खासदाराला साधा हिंदुत्व हा शब्द तरी लिहायला येईल का असा सवाल विचारत रामराजेंनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. (Maharashtra News)

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara News: रामराजे नाईक निंबाळकरांना काेणाचं राजकारण कळेना ?

येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फलटण मधलं राजकारण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साता-यातील फलटण दौ-यावर येणार आहेत. या दौ-या पुर्वी रामराजेंनी केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात रंगली आहे. आता अमित शहा (Amit Shah In Phaltan) यांच्या फलटण दौ-यात रामराजेंच्या या टिकेला कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातय हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com