रामराजे नाईक निंबाळकरांच्या नव्या फतव्याने राजकीय क्षेत्रात उडाला धूरळा

आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त रामराजेंनी फलटणात कार्यक्रम आयाेजिला हाेता.
ramraje naik nimbalkar
ramraje naik nimbalkarsaam tv
Published On

फलटण : जागतकि पर्यावरण दिना (world environment day) निमीत्त सातारा (satara) जिल्ह्यातील फलटण (phaltan) शहरात एक हजार झाडं लावण्यात आली. या उपक्रमाचा प्रारंभ विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला. या कार्यक्रमात विनविभाग सातारा, मुधोजी महाविद्यालय फलटण तसेच आम्ही निसर्ग सोबती या संस्थांनी सहभाग घेतला.

यावेळी निसर्गासाठी मोलाचा हातभार लावुन लावलेली झाडे जगवण्यासाठी कायम प्रयत्न करण्याचा निश्चय करुन फलटण तालुक्यातील जावली गावात १५ लाख झाडं लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला.

ramraje naik nimbalkar
विधान परिषदेवर धनगर समाजास प्रतिनिधित्व द्या : यशाेमती ठाकूरांची पटाेलेंना गळ

यावेळी रामराजे म्हणाले प्रत्येकाने दहा झाडं लावली पाहिजेत. निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर दहा झाडं लावुन दाखवा असा फतवाच काढला पाहिजे असा सल्ला सुद्धा रामराजे यांनी दिला. झाडं लावण्याच्या बाबतीत ग्लॅमर आलं पाहिजे. अभिनेत्यांनी या चळवळीत आले पाहिजे. त्यांच्या येण्यामुळं युवा वर्ग यात सहभागी होईल. झाडं लावण्याची चळवळ निर्माण होईल असे राजेंनी नमूद केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, उपवनसंरक्षक महादेव मोहीते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

ramraje naik nimbalkar
कृष्णा नदीवरील ऐतिहासिक बंधारा वाचवण्यासाठी सांगलीकर एकवटले
ramraje naik nimbalkar
दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com