Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Ramdas Kadam Challenges ShivSena: रामदास कदमांच्या एका विधानानं राज्यात एकच खळबळ उडालीय... बाळासाहेबांबद्दल कदमांनी केलेल्या या विधानानंतर ठाकरेसेनेनं काय भूमिका घेतलीय? बाळासाहेबांच्या निधनाआधी नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam addressing media as Shiv Sena leaders react to his controversial statement on Balasaheb Thackeray.
Ramdas Kadam addressing media as Shiv Sena leaders react to his controversial statement on Balasaheb Thackeray.Saam Tv
Published On

शिंदेंच्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदमांनी केलेलं हे विधान..या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातून वेगवेगळे आरोप केलेत..मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला तब्बल 10 वर्ष उलटून गेल्यानंतर अशाप्रकारचं वक्तव्य दसरा मेळाव्यात केलं गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात...रामदास कदम नेमकं काय म्हणाले ऐका...

दुसरीकडे रामदास कदमांनी केलेल्या दाव्यावरून ठाकरेसेना ही आक्रमक झालीय.. ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं...त्याच्याविषयी असं वक्तव्य करून बेईमानी करताय, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय...तर भास्कर जाधवांनी कदमांना सावली बारवरून खोचक टोला लगावलाय...

दरम्यान रामदास कदमांनी आपल्या विधानाचा पुर्नउच्चार केलाय.. सत्य समोर येण्यासाठी माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं थेट आव्हान रामदास कदमांनी दिलंय.सावली बार प्रकरणात योगेश कदमांच्या अडचणी वाढल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.. त्यानंतर रामदास कदमही ठाकरे सेनेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले.. अशातच बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला एक दशक उलटून गेल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असतानाच कदमांनी आत्ताच हे विधान का केलं? यामागे नेमका उद्देश काय? कदमांच्या विधानात खरचं तथ्य आहे का? .. आणि कदमांच्या विधानाला उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com