Maharashtra politics : शरद पवार आणि अजित पवार आजही एकत्र, मोदी सरकारमधील मंत्र्याचं विधान

Ramdas Athawale News : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जालना येथे वक्तव्य करत सांगितले की, शरद पवार आणि अजित पवार आजही एकत्र आहेत. लाडकी योजनेसाठी समाजकल्याण खात्याचा निधी वळवणं चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार गटाच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेला पुन्हा फोडणी
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? राजकीय वर्तुळात तुफान चर्चाsaam tv
Published On

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Sharad Pawarand Ajit Pawar News : शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते, आजही आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. जालना येथे एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. आठवले यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, शरद पवार यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार आणि अजित पवार पूर्वी एकत्र होते, आजही आहेत. अजित पवारांचं म्हणणं स्पष्ट होतं, शिवसेना चालते तर भाजप का नाही? शरद पवार जर आमच्या सोबत आले असते, पंतप्रधान मोदींच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं असतं, ते देशाचे राष्ट्रपती झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा देतील, तर त्यांचं स्वागत आहे,” असं आठवले म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार गटाच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेला पुन्हा फोडणी
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार थेट बोलले, VIDEO

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील, तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांनाही एकत्र यावे लागेल. पण मला वाटते, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. जर आले, तर महाविकास आघाडीत फूट पडेल. याचा फायदा आम्हाला होईल. दोघांनी एकत्र यावे, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा बदल होणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार गटाच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेला पुन्हा फोडणी
Maharashtra Politics : अजित पवार हा एक फुटलेला गट, प्रफुल्ल पटेल दाऊद; संजय राऊतांची जळजळीत टीका, VIDEO

लाडकीचा निधी वळवला ?

रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या वाटपावरही यावेळी भाष्य केले. आठवले म्हणाले, संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय खात्याचा गोरगरिबांसाठीचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवणे योग्य नाही. समाज कल्याणाव्यतिरिक्त इतर मोठी खाती आहेत. त्यांचा निधी या योजनेसाठी वापरावा. कर्नाटकात कायदा आहे की सामाजिक खात्याचा निधी दुसरीकडे वळवता येत नाही. महाराष्ट्र सरकारनेही असा कायदा करावा, असे रामदास आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच त्यांना हे पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार? अजित पवार गटाच्या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेला पुन्हा फोडणी
Nanded News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांना भेट|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com