हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही; रामदास आठवलेंचा राज्य सरकारवरती घणाघात

राज्यात खड्याचे साम्राज्य असून हे खड्यांच सरकार आहे.
रामदास आठवले
रामदास आठवलेSaamTv
Published On

उल्हासनगर : राज्यात खड्याचे साम्राज्य असून हे खड्यांच सरकार आहे, जर रस्त्यांवरील खड्डे बुझवले नाही तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. या सरकारने राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावे असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री रामदास आठवले यांनी उल्हासनगर मध्ये केलं आहे ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उल्हासनगर येथे आले होते. (Ramdas Athavale's criticism of the state government)

हे देखील पहा -

सेल्फी विथ खड्डा -

जसजशा मुंबई पालिकेसह अन्य महापालिकांच्या निडणूका जवळ येत आहेत तसं सर्वपक्षीय नेते सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरण्याचा प्रयत्न करत असतात आणि याचाच प्रत्येय आता मुंबईकरांना येत आहे. आत्ताच अमित ठाकरेंनी कल्याण मधील रस्त्यांवरती पडलेल्या खड्डयांवरुन शिवसेनेवरती टीका केली होती. दरम्यान नेटकऱ्यांनी देखील भाजपच्या काळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुरु केलीली 'सेल्फी विथ खड्डा' हि मोहीम त्यांचेच फोटो व्हायरल करुन सुरु केली आहे. आणि राज्यकर्त्यांना त्यांच्याच उपक्रमांची आठवण करुन देत असतानाच आज आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उल्हासनगर मध्ये आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी वरतीच निशाना साधला आहे. हे खड्ड्यांच सरकार असून ते खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले आहेत.

रामदास आठवले
शेतकरी विरोधी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी

सत्ताधाऱ्यांना आपल्याच कामांची आठवण करुन देत असतानाच खड्डांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवरती आला आहे. याचा सर्वात जास्त त्रास मुंबईकरांना होतोय त्यामुळे जनतेच्या रोषाला वाचा फोडून राजकीय समीकरण जुळवायला राजकारणी लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com