raksha bandhan 2022 : आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली; भावासाठी राखी घेण्यासाठी बहिणींची लगबग सुरू

नवी मुंबईत (Navi Mumbai) महिला-तरुणी त्यांच्या भाऊरायांसाठी आकर्षक, सुंदर आणि सुबक राखी खरेदीसाठी बाजारात फिरताना दिसत आहे.
navi mumbai news
navi mumbai news saam tv
Published On

सिद्धार्थ म्हात्रे

Navi Mumbai News : श्रावण महिन्यातील रक्षाबंधन हा दुसरा महत्वाचा सण. बहिण-भावाच्या नात्यामधील बंध अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा रक्षाबंधन (Raksha Bandhan) ११ ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या हाता वर प्रेमाचा धागा राखीच्या स्वरूपात बांधते. बहिण-भावाचा हा सण गेल्या दोन वर्षांपासून कोव्हिडमुळे अनेक जणांना साजरा करता आला नाही. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबईत (Navi Mumbai) महिला-तरुणी त्यांच्या भाऊरायांसाठी आकर्षक, सुंदर आणि सुबक राखी खरेदीसाठी बाजारात फिरताना दिसत आहे.

navi mumbai news
Maharashtra Rain Update: मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राख्या खरेदी साठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मागचे २ वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे रक्षाबंधन हा साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल असल्याने बहिण-भावांचा आनंद द्विगुणित झाला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये २ रुपयांपासून ते ४९९ रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. डायमंड राखी, चंदन राखी तसेच रुद्राक्ष राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत या वर्षी राखी घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे.

navi mumbai news
बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले शिवाजी पार्कवरील 'ते' झाड कोसळले

दरम्यान, मागच्या दोन वर्षात लॉकडाऊनमुळे राखी विकणाऱ्या व्यापाऱ्यांना, उद्योगांना, व्यावसायिकांना कोरोनाचा चांगला फटका बसला होता. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेकांनी रक्षाबंधन साजरा न करता घरी राहणेच पसंत केले होते. काही ठिकाणी बाजारपेठ खुली असून देखील ग्राहक कोरोनाच्या भीतीपोटी राखी घेण्यासाठी घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात काही महिला-तरुणींनी भावाला पोस्टाद्वारे, कुरीअरद्वारे राख्या पाठवल्या. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल असल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी राखी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याची प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com