Raksha Bandhan 2022: ज्ञानेश्वर माऊलींना सोन्याची राखी अर्पण करत रक्षाबंधन सण केला साजरा

Raksha Bandhan Alandi Gold Rakhi News : गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.
Raksha Bandhan Alandi Gold Rakhi
Raksha Bandhan Alandi Gold Rakhiगोपाळ मोटघरे
Published On

पिंपरी-चिंचवड, पुणे: बहीण-भावांचं अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). याच सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे. (Raksha Bandhan Alandi Gold Rakhi)

हे देखील पाहा -

वारकरी मंडळी ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ अस सर्व काही मानतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊलीप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याची राखी (Golden Rakhi) ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. पंढरपूरचा विठ्ठल, आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली आणि देहु येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कृपेने जगावरील कोरोना सारखं जीवघेणं संकट दूर झालं आहे. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे.

Raksha Bandhan Alandi Gold Rakhi
Sai Baba Shirdi : साईंमध्ये कृष्ण दिसतात; भक्ताने अर्पण केली पाच लाखांची सोन्याची बासरी

यामुळे ज्ञानेश्वर माऊलीविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना सोन्याची राखी अर्पण करुन रक्षाबंधन सण साजरा केला आहे. त्याचबरोबर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचीदेखील ज्ञानेश्वर माऊलींनी रक्षा करावी अशी प्रार्थना गाडे कुटुंबीयांनी या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com