मुंबई : भाजपने (BJP) राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) बिनविरोध करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) स्वत: अॅक्शन मोडमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांसह अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भूजबळ, अशोक चव्हाण यांच्यासह महत्वाचे मंत्री हजर राहणार असल्याची माहिती आहे. (Rajya Sabha Election Latest News)
या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांना गळ घालतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही.
सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता 15 तर भाजपला 20 मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा 29 मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल.
विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.